Margashirsha Guruvar Vrat 2022 Dates: मार्गशीर्षमधील गुरूवारच्या महालक्ष्मी व्रताच्या तारखा जाणून घ्या 

यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार नाही तर 5 गुरूवारचे व्रत असणार आहे. 22 डिसेंबरच्या रात्री अमावस्या 7 वाजून 14 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर अमावस्या समाप्ती 23 डिसेंबर दिवशी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनी होणार आहे.

Margashirsha Guruvar Vrat 2022 Dates read in marathi
मार्गशीर्षमधील गुरूवारच्या महालक्ष्मी व्रताच्या तारखा जाणून 
थोडं पण कामाचं
  • दिवाळी झाल्यावर काही दिवसांतच मार्गशीर्ष (Margashirsha) महिना येतो.
  • पवित्र हिंदू महिन्यांपैकी एक मार्गशीर्ष मानला जातो.
  •  या महिन्याच्या दर गुरूवारी महालक्ष्मी मातेचे व्रत (Margashirsha Guruvar Vrat) करण्याची अनेक वर्षांची परंपरा आणि पद्धत आहे.  

मुंबई : दिवाळी झाल्यावर काही दिवसांतच मार्गशीर्ष (Margashirsha) महिना येतो. पवित्र हिंदू महिन्यांपैकी एक मार्गशीर्ष मानला जातो.  या महिन्याच्या दर गुरूवारी महालक्ष्मी मातेचे व्रत (Margashirsha Guruvar Vrat) करण्याची अनेक वर्षांची परंपरा आणि पद्धत आहे.  यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 24 नोव्हेंबर 2022 पासून होणार आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस हा गुरूवार आहे. त्यामुळे या व्रताची सुरूवात मोठ्या आनंदात आणि उत्साहात होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील सारे गुरूवार महालक्ष्मी व्रतासाठी (Mahalaxmi Vrat) पाळले जातात. यानिमित्त घरात घटांची स्थापना केली जाते.  सकाळ संध्याकाळ महालक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच शेवटचा मार्गशीर्ष गुरूवार हा खास अंदाजात, हळदी कुंकू समारंभाने साजरा केला जातो. मग यंदा तुम्ही देखील मार्गशीर्ष गुरूवात व्रत पाळणार असाल तर पहा या व्रताच्या नेमक्या तारखा कोणत्या? या निमित्ताने घरात काय केले जाते?

अधिक वाचा : हंसिका मोटवानीचा वेट लॉस journey

मार्गशीर्ष गुरूवार 2022 व्रत तारखा

  1. पहिला गुरूवार - 24 नोव्हेंबर
  2. दुसरा गुरूवार - 1 डिसेंबर
  3. तिसरा गुरूवार - 8 डिसेंबर
  4. चौथा गुरूवार - 15 डिसेंबर
  5. पाचवा गुरूवार - 22 डिसेंबर

यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरूवारांचे व्रत साजरं केले जाणार आहे. 22 डिसेंबरच्या रात्री अमावस्या 7 वाजून 14 मिनिटांनी सुरू होणार असून समाप्ती 23 डिसेंबर दिवशी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांची आहे. 

मार्गशीर्ष गुरूवारी महिला स्नान करून सकाळी महालक्ष्मी व्रतासाठी घटाची मांडणी करतात. पाच पानं आणि नारळाने घट बनवला जातो. त्याचा साजशृंगार केला जातो. या घटासमोर महालक्ष्मीचा मुखवटा लावण्याची किंवा फ्रेम ठेवण्याची पद्धत आहे. त्यानंतर सकाळ संध्याकाळ पूजा करून, महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचून नैवेद्य दाखवला जातो. यानिमित्ताने महिला दिवसभर उपवास देखील करतात.

शेवटच्या गुरूवारी लक्ष्मीच्या रूपात जवळच्या, नात्यातल्या सवाष्ण महिला, कुमारिका यांना बोलावून हळदी कुंकू, मसाल्याचे दूध दिले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी