मुंबई: कोणत्याही ग्रहाचे एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन(transist) म्हणजे गोचर म्हणतात. जूनमध्ये ५ मोठे ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात एक मंगळही(mangal) आहे. मंगळ ग्रह २७ जनला सकाळी ५ वाजून ३९ मिनिटांनी परिवर्तन करत आहे. या दरम्यान मंगळ ग्रह मीन राशीतून(pisces) निघून मेष राशीमध्ये(aries) गोचर करणार आहे. मंगळ ग्रहाचे हे परिवर्तन काही राशींसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. Mars transist in aries, will be beneficial for this 4 zodiac sign
अधिक वाचा - राजस्थानला मात देत RCBला मिळणार फायनलचे तिकीट?
या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ गोचर हे शुभ फळ देणारे ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. या दरम्यान उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. तर व्यवसायिकांनाही या परिवर्तनाचा फायदा होणार आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापासून बचाव करा. मंगळ ग्रहाच्या गोचरदरम्यान तुमच्या बोलण्यात कठोरपणा येऊ शकतो. याचा प्रभाव व्यवसायावर होण्याची शक्यता आहे. तर करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यावेळेस भाग्याची साथ मिळणार आहे. तसेच कौटुंबिक जीवनात संतुलन कायम राहील. या दरम्यान, छोटासा प्रवास घडू शकतो. तसेच हा प्रवास फायदेशीरही ठरू शकतो. प्रॉपर्टीच्या प्रकरणातही फायदा मिळू शकतो. नोकरीपेशा लोकांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी ही वेळ अनुकूल असणार आहे. मात्र एकावेळेस बरीच कामे हातात घेऊ नका. मंगळ ग्रहाच्या गोचरने घरात सगळं मंगल होणार आहे. घरात सुख-शांती राहील.
या राशीमध्ये परिवर्तन हे चतुर्थ भावात होत आहे. याला सुख भाव मानला जातो. या गोचर दरम्यान जमीन-जुमल्याचे फायदे होऊ शकतात. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी शुभ फलप्राप्ती होऊ शकते. या दरम्यान आर्थिक गोष्टींबाबत सजग राहा.
अधिक वाचा - एका दिवसात एवढी अंडी खाल्ल्याने वाढतो कोलेस्टेरॉलचा धोका
या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ गोचर अनुकूल राहणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. धन प्राप्ती होऊ शकते. भाग्याची संपूर्ण साथ मिळेल. जर काम करण्याचा विचार करत आहात तर तो करू शकता. या दरम्यान ज्या कामात हात टाकाल तेथे यश मिळेल. दात अथवा डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. बोलताना संयम ठेवा त्यामुळे कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकते. परदेशी प्रवासाचेही योग संभवतात. गाडी चालवताना काळजी घ्या.
(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती ही सामान्य मान्यता तसेच माहितीच्या आधारावर आहे. Times Now Marathi याला दुजोरा देत नाही. )