Monthly Rashifal January 2022 : जानेवारी महिना 'या' राशीच्या व्यक्तींना ठरेल लाभदायी!

Monthly horoscope (मासिक राशीभविष्य), January 2022: जानेवारी २०२२ महिन्याचे राशीभविष्य. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींचे जाणून घ्या मासिक राशीभविष्य.

Masik rashifal January 2022 Monthly horoscope in marathi for all zodiac signs
जानेवारी महिना 'या' राशींसाठी लाभदायी! 
थोडं पण कामाचं
 • January 2022 : जानेवारी महिना 'या' राशीच्या व्यक्तींना ठरेल लाभदायी!
 • कोणत्या राशीसाठी कसा असेल हा महिना?
 • काय आहे आपले भविष्य?

January 2022 Monthly Horoscope जानेवारी २०२२ मासिक राशीभविष्य : नववर्षातील पहिला महिन आहे जानेवारी महिना. या महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आणि शुक्र धनु राशीत तर राहु वृषभेत आहे. मंगळ आणि केतू वृश्चिक राशीत तसेच शनि आणि बुध मकर राशीत आहे. गुरु कुंभ राशीत गोचर आहे. यामुळे जानेवारी महिन्यात (जानेवारी २०२२) कन्या आणि मीन राशीला लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ होईल. कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीत चांगले दिवस येतील किंवा चांगली नोकरीची संधी मिळेल. मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींचे नेतृत्वगुण प्रभावी ठरतील. जाणून घेऊ नववर्षातील पहिल्या महिन्याचे अर्थात जानेवारी २०२२ चे  मासिक राशीभविष्य.

 1. मेष Aries Horoscope - विद्यार्थ्यांची प्रगती होईल. पहिल्या पंधरवड्यात महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे. १६ ते २९ जानेवारी या कालावधीत नोकरीत बरे दिवस आहेत पण हलगर्जीपणाचा त्रास होऊ शकतो. दर रविवारी गुळ दान करा. शुभ रंग - पिवळा आणि लाल
 2. वृषभ Tauras Horoscope - नेतृत्वगुणांचा लाभ होईल. १६ जानेवारी नंतर महत्त्वाचे निर्णय घ्या. वाहन खरेदीची इच्छा होऊ शकते. दर शनिवारी गरीबाला अंथरुण-पांघरुण दान करा. मिथुन आणि मकर राशीतील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. शुभ रंग - पिवळा आणि पांढरा
 3. मिथुन Gemini Horoscope - ५ ते १८ जानेवारी दरम्यान व्यवसायात उत्तम दिवस आहेत. विद्यार्थी परदेशी जाण्याची योजना तयार करू शकतात. काही निर्णयांविषयी संभ्रम राहील. गणपती दर्शन करा आणि बाप्पाला लाडू आणि दुर्वा अर्पण करा. शुभ रंग - हिरवा आणि निळा
 4. कर्क Cancer Horoscope - ३ ते १५ जानेवारी दरम्यान नोकरीत छान दिवस आहेत. नव्या जबाबदाऱ्या प्रभावीरित्या हाताळाल. १५ ते २२ जानेवारी दरम्यान धार्मिक कारणाने प्रवास होईल. शंकराचे दर्शन घ्या. आरोग्य उत्तम राहील. वडिलांचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग - लाल आणि पिवळा
 5. सिंह Leo Horoscope - १७ ते २३ जानेवारी दरम्यान नोकरीत चांगले दिवस आहेत. व्यवसाय करणाऱ्यांनी महत्त्वाचे व्यवहार करताना सावध राहावे. हातून धार्मिक कार्य घडेल. शंकराचे दर्शन घ्या. सूर्याला जल अर्पण करुन त्याचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग - नारंगी आणि पांढरा
 6. कन्या Virgo Horoscope - धनलाभाचा योग आहे. मकरसंक्रातीनंतर नोकरीत बदल करण्याचा विचार करण्यास हरकत नाही. दीर्घ काळ रखडलेले काम पूर्ण होईल. मकर आणि कर्क राशीच्या व्यक्तींचे उत्तम सहकार्य लाभेल. दररोज हनुमानाचे दर्शन घ्या. शुभ रंग - निळा आणि पांढरा
 7. तूळ Libra Horoscope - पहिल्या आठवड्यात तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी ७ ते १२ जानेवारी हा काळ अतिशय छान आहे. दररोज हनुमानाचे दर्शन घ्या आणि तीन प्रदक्षिणा घाला. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग - निळा आणि हिरवा
 8. वृश्चिक Scorpio Horoscope - विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. १३ ते २० जानेवारी दरम्यान नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. दर मंगळवारी गव्हाचे दान करा. दुसरा पंधरवडा वाहन खरेदीसाठी चांगला आहे. शुभ रंग - पांढरा आणि पिवळा
 9. धनु Sagittarius Horoscope - नेतृत्वगुणांचा लाभ होईल. योग्य आणि विचारपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. नोकरीत प्रगती होईल. सिंह आणि मीन राशीचे सहकार्य लाभेल. अन्नदान करा. शुभ रंग -पांढरा आणि लाल
 10. मकर Capricorn Horoscope - विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ. दुसऱ्या पंधरवड्यात नेतृत्वगुणांचा प्रभाव दिसेल. १५ ते २२ जानेवारी हा काळ नोकरीत करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. बढतीचा अथवा नोकरी बदलाचा योग आहे. दर सोमवारी शंकराचे दर्शन घ्या. दर शनिवारी तिळाचे दान करा. शुभ रंग - हिरवा आणि निळा
 11. कुंभ Aquarius Horoscope - ९ ते १२ जानेवारी दरम्यान तब्येत सांभाळा. तुळ आणि कुंभेचे सहकारी आपल्यासाठी लाभदायी. ११ जानेवारी नंतर प्रवास लाभदायी. अन्नदान करा आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग - पांढरा आणि हिरवा
 12. मीन Pisces Horoscope - नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगला काळ. धनलाभ होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. मेष आणि वृश्चिक राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. दर मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्या आणि तीन प्रदक्षिणा करा. दररोज आईचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडावे. अन्नदान करा. शुभ रंग - लाल आणि नारिंगी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी