Numerology: या राशीतील लोकांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते; मात्र त्यांच्या एका सवयीमुळे सर्वजण असतात नाराज

भविष्यात काय
Updated Jun 07, 2022 | 10:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Born Date Astrology । अंकशास्त्राच्या आधारे माणसाचा स्वभाव आणि त्याची वागणूक अगदी सहजपणे ओळखता येते. कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख हा त्याचा मूलांक क्रमांक असतो.

Mata Lakshmi's grace is always with the people of this zodiac sign
या राशीतील लोकांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते, मात्र...   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंकशास्त्राच्या आधारे माणसाचा स्वभाव आणि त्याची वागणूक अगदी सहजपणे ओळखता येते.
  • कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख त्याचा मूलांक ठरवत असते.
  • मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे.

Born Date Astrology । मुंबई : अंकशास्त्राच्या आधारे माणसाचा स्वभाव आणि त्याची वागणूक अगदी सहजपणे ओळखता येते. कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख ही त्याचा मूलांक क्रमांक ठरवत असते. दरम्यान आज आपण कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचे स्वभाव आणि वागणूक जाणून घेणार आहोत. (Mata Lakshmi's grace is always with the people of this zodiac sign). 

मूलांक ४ वर या देवतांचा असतो आशिर्वाद

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ४, १३, २२ आणि ३१ तारखेला झाला आहे, अशा लोकांचा मूलांक ४ आहे. त्यामुळे मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे आणि राहूचा संबंध सूर्याशी आहे. त्यामुळे या तारखांना जन्मलेल्या लोकांवर भगवान सूर्याची विशेष कृपा असते.

अधिक वाचा : कुवैतच्या सुपरमार्केटमधून भारतीय उत्पादनं हटवली

मूलांक ४ मधील लोकांचा स्वभाव

अंकशास्त्रानुसार, १ ते ९ पर्यंत प्रत्येक मूलांकात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक भिन्न असते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा शांत आणि बोलकेपणा यात फरक आढळतो. मूलांक ४ च्या लोकांचे भविष्य खूप उज्ज्वल आणि प्रसन्न आहे. करिअरमध्ये ही लोक खूप पुढे जाणार आहेत. त्यांना नशिबाची साथ लाभेल. ते स्वभावाने स्वार्थी असतात आणि हा स्वभाव त्यांच्या लहानपणापासूनचा आहे. हे लोक इतरांकडून काम करून घेण्यात पटाईत असतात.


मूलांक ४ मधील लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. ते श्रीमंत असून प्रत्येक कामात यश मिळवतात. अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. त्याचबरोबर कीर्ती आणि सन्मानही प्राप्त होतो. या लोकांना पैशाची कधीच कमतरता भासत नाही.  त्यामुळे ते स्वभावाने अहंकारी असतात. इतर लोकांचा हा स्वभाव त्यांना अजिबात आवडत नाही. मूलांक ४ च्या लोकांना इतरांना भेटणे, बोलणे किंवा कोणत्याही कामात मदत करणे आवडत नाही. त्यांना स्वबळावर जगायला आवडते. तसेच ते स्वार्थी प्रवृत्तीचे असतात कारण त्यांचे काम होईपर्यंतच ते इतरांना सोबत ठेवतात. 

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी