Budh Gochar: बुध ग्रहाचे वृषभ राशीत झाले संक्रमण; या ४ लोकांची वाढू शकते डोकेदुखी 

भविष्यात काय
Updated Jun 08, 2022 | 09:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Budh Gochar । ३ जून रोजी बुध ग्रहाचे वृषभ राशीत संक्रमण झाले आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे अनेक राशींना चांगला लाभ होणार आहे, तर काही राशीतील लोकांची या संक्रमणामुळे डोकेदुखी वाढणार आहे.

Mercury has been in Taurus since June 3
बुध ग्रहाचे वृषभ राशीत झाले संक्रमण, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ३ जून पासून बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.
  • बुध ग्रहाचे संक्रमण वृषभ राशीत होत आहे.
  • बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातही चढ-उतार घेऊन येईल.

Budh Gochar । मुंबई : ३ जून रोजी बुध ग्रहाचे वृषभ राशीत संक्रमण झाले आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे अनेक राशींना चांगला लाभ होणार आहे, तर काही राशीतील लोकांची या संक्रमणामुळे डोकेदुखी वाढणार आहे. चला तर म जाणून घेऊया बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीतील लोकांच्या अडचणीत होणार आहे. (Mercury has been in Taurus since June 3). 

अधिक वाचा : गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे धक्कादायक कारण

  1. कन्या राशी - बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे त्याचा कन्या राशीवर संमिश्र प्रभाव जाणवेल. तुम्हाला अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागेल, मात्र तुमच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे तुम्ही कठीण प्रसंगांना देखील तोंड देऊ शकाल. घरातील सदस्यांशी वाद होऊ शकतो, भांडणे टाळण्याचा प्रयत्न करा, खासकरून लहान भावासोबत वाद टाळा.
  2. तूळ राशी - बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातही चढ-उतार घेऊन येईल. या काळात प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित आजारांपासून दूर राहावे लागेल. खासकरून पोटाच्या आजारांपासूनही सावध राहा. अनेक लोक तुमच्याविरुद्ध कट रचतील पण त्यांच्या फंदात पडू नका. तुमचे काम उरकून थेट घराकडे या शक्य तितका वाद टाळण्याचा प्रयत्न करा. 
  3. धनु राशी - धनु राशीच्या सहाव्या शत्रू भावावर बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव फारसा सकारात्मक आहे असे म्हणता येणार नाही. कारण अनेक सुशिक्षित आणि गुप्त शत्रू तोंड वर काढतील. लोक तुम्हाला अपमानित करण्याची संधी पाहत आहेत. सर्व वाद आणि न्यायालयीन प्रकरणे या काळात सोडवा. आरोग्याबाबत जागरूक राहा. या काळात इतरांना जास्तीचे पैसे देऊ नका. मित्र आणि कुटुंबासाठी अप्रिय बातमी असू शकते, परंतु तुमच्याकडे परदेश प्रवासाचा पर्याय देखील आहे.
  4. कुंभ राशी - राशीतील चौथ्या भावात बुधाचे संक्रमण अनपेक्षित परिणाम देईल. आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वाद होऊ शकतात, जरी निर्णय तुमच्या बाजूने असला तरीदेखील. तुम्ही तुमच्या योजना आणि रणनीती गोपनीय ठेवल्यास तुम्ही अधिक यशस्वी व्हाल.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी