Budh Gochar: बुध ग्रह वक्र चाल संपवून करणार संक्रमण; या ५ राशीतील लोक होणार मालामाल

भविष्यात काय
Updated Jun 02, 2022 | 11:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Budh Gochar 2022 । बुध ग्रहाला नऊ ग्रहांचा राजा म्हटले जाते. बुध ग्रहाच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. बुध ग्रह हा वाणी, अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता, व्यवसाय इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो.

Mercury is transiting in Taurus on June 3, 2022
बुध ग्रह वक्र चाल संपवून वृषभ राशीत करणार संक्रमण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • बुध ३ जून २०२२ रोजी वृषभ राशीत प्रवेश करत आहे.
 • १० मे २०२२ रोजी बुध ग्रह वक्र स्थितीत होता.
 • या काळात कन्या राशीतील लोकांचे प्रमोशन होऊ शकते.

Budh Gochar 2022 । मुंबई : बुध ग्रहाला नऊ ग्रहांचा राजा म्हटले जाते. बुध ग्रहाच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. बुध ग्रह हा वाणी, अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता, व्यवसाय इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. या सर्वांवर बुध ग्रहाचा प्रभाव पडतो. १० मे २०२२ रोजी बुध ग्रह वक्र स्थितीत झाला होता परंतु ३ जून २०२२ रोजी तो पुन्हा वृषभ राशीत मार्गस्थ होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे १२ राशींच्या लोकांवर विशेष परिणाम होणार आहे. (Mercury is transiting in Taurus on June 3, 2022).  

अधिक वाचा : रेल्वे अधिकाऱ्याच्या टेबलावर बसला तब्बल सहा फुटांचा कोब्रा

बुध ग्रहाच्या संक्रमणाचा राशींवर पडणार प्रभाव 

 1. मेष राशी - बुध ग्रह दुसऱ्या भावात संक्रमण करेल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. नवीन संधी उपलब्ध होतील आणि प्रत्येकजण तुमच्या आवाजाने आकर्षित होईल आणि तुमचा प्रभाव समाजावर होईल.
 2. वृषभ राशी - पहिल्यापासून असलेल्या समस्यांमधून काहीशा प्रमाणात दिलासा मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. तब्येतही सुधारेल, पण व्यवसायात नुकसान होऊ शकते.
 3. मिथुन राशी - खर्च अचानक वाढू शकतो. अचानक कोणतीही धक्कादायक बातमी मिळू शकते, परंतु ज्यांचा व्यवसाय निर्यात-आयातीचा असेल, त्यांना फायदा होईल. तब्येतीची विशेष काळजी घ्या.
 4. कर्क राशी - व्यापार व्यवसायातून लाभ मिळेल. गुंतवणुकीचा फायदाही तुम्हाला मिळेल. अचानक सर्वकाही चांगले होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकता. पण तुम्हाला कर्ज देणे टाळावे लागेल.
 5. सिंह राशी - आपल्या वडिलांचा आशिर्वाद घ्या, तुमचे कार्य यशस्वी होईल. योजना यशस्वी होताना दिसत आहेत. नोकरी व्यवसायातही यश मिळेल. गुंतवणूक विचारपूर्वक करावी. 
 6. कन्या राशी - अचानक तुमचे भाग्य उजळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरीत प्रमोशन होईल. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळू शकते, पण अति घाईमुळे काम बिघडू शकते.
 7. तूळ राशी - विचारपूर्वक कोणताही व्यवहार करा नाहीतर संबंध बिघडू शकतात. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. भांडणापासून दूर राहा. व्यापार व्यवसायातही संघर्ष करावा लागेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
 8. वृश्चिक राशी - अचानक आर्थिक लाभ होईल. व्यवसाय चांगला चालेल, परंतु तब्येत अचानक बिघडू शकते. त्वचेची ॲलर्जी होऊ शकते.
 9. धनु राशी - खर्चाचे बजेट बिघडू शकते, अचानक खर्च वाढू शकतो. परदेशातून काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्यामध्ये आधीच समस्या असल्यास, तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आरोग्याकडे जरूर लक्ष द्या. व्यवसायात नुकसान होऊ शकते.
 10. मकर राशी - व्यवसायात नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याने आता नवीन व्यवसाय सुरू करू नये. गुंतवणुकीपासून दूर राहा. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते आणि अपत्याला यश मिळू शकते. जी मंडळी अभ्यास करत आहे, त्यांचा निकाल चांगला येईल, मेहनतीचे फळ मिळेल.
 11. कुंभ राशी - गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आईची साथही मिळेल, पण वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
 12. मीन राशी - व्यवसायात नुकसान होऊ शकते, सावधगिरीने वागावे लागेल. नोकरीत मेहनत घ्यावी लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा भांडण होऊ शकते.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी