Budh Margi 2022: आजपासून बुध खेळणार सरळ खेळी, पुढील १ महिन्यापर्यंत करिअर-धनसंपत्तीवर होणार परिणाम

भविष्यात काय
Updated Jun 03, 2022 | 09:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mercury: आजपासून बुध ग्रह वृषभ राशीमध्ये मार्गक्रमण करत आहे. धन, बुद्धी, व्यापार संवादाचे कारक बुध सरळ चाल करू सर्व १२ राशींवर परिणाम करणार आहे. हा परिणाम १  महिन्यांपर्यंत राहणार आहे. 

horoscope
आजपासून बुध खेळणार सरळ खेळी, या राशींच्या करिअरमध्ये अडथळा 
थोडं पण कामाचं
  • कन्या राशीच्या लोकांना बुध वाणीमध्ये गोडवा देतील.
  • सिंह राशीच्या लोकांना बुध लाभदायक ठरणार आहे
  • मकर राशीच्या लोकांसाठी ही वेळ चांगली आहे.

मुंबई: बुधचे(mercury) मार्गी होणे सर्व लोकांच्या जीवनावर परिणाम टाकणारे असते. आज म्हणजेच ३ जूनपासून बुध मार्गी होत आहे. बुध वृषभ राशीमध्ये(tauraus) आहे आणि आजपासून सरळ चाल चालण्यास सुरूवात करणार. यानंतर २ जुलैपर्यंत बुध या स्थितीत राहणार आणि मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे. बुध मिथुन राशीमध्ये गोचर केल्यापर्यंत ते काही राशींवर चांगलेच मेहरबान राहणार आहे तर काही राशींच्या करिअरमध्ये बाधा निर्माण करतील. जाणून घेऊया बुध मार्गी होण्यावर राशीवर काय परिणाम होणार...mercury transist in tauraus will effect on other zodiac sign

अधिक वाचा - पाण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या महिलांचा व्हिडिओ...

मेष रास - बोलण्याने अनेक कामे होतील. कोर्ट-कचेरीची प्रकरणे निपटणार. कर्ज घेण्यापासून सावधान. लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्नकरतील मात्र तुम्ही त्यातून बाहेर पडाल. 

वृषभ रास - एकामागोएक यश मिळत राहील. एखादे नवे कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकता. व्यापारात लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील. लग्न करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकता. नवदाम्पत्यांना बाळाबाबत गुडन्यूज मिळू शकते. 

मिथुन रास- खर्च वाढतील. प्रवास होतील. दान-धर्म कराल. इन्कम वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आपल्या योजना गुप्त ठेवाल. काही नवी कामे करू शकतात. एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर साईन करू शकता. 

सिंह रास - सिंह राशीच्या लोकांना बुध लाभदायक ठरणार आहे. पद-प्रतिष्ठा वाढेल. खासकरून महिलांसाठी ही वेळ चांगली आहे. धनलाभ होईल. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवासादरम्यान आपल्या सामानाची काळजी घ्या. 

कन्या रास - कन्या राशीच्या लोकांना बुध वाणीमध्ये गोडवा देतील. तुमची कामे अगदी सहजतेने होतील. या दरम्यान घेतले गेलेले निर्णय लाभदायक ठरतील. अप्रत्यक्षपणे धनलाभाची शक्यता आहे. प्रवास होऊ शकतात. 

तूळ रास - अप्रत्यक्षपणे चढ-उतार येतील. जर कामांमध्ये अडथळे आले तर निराश होऊ नका. तुमचे यश निश्चित आहे. केवळ पोटासंबंधी विकारापासून बचाव करा. लोक तुमच्यामागे षडयंत्र रचू शकतात. वादापासून दूर राहा. या दरम्यान जास्त लोकांमध्ये मिसळू नका. 

वृश्चिक रास - व्यापारांना लाभ होईल. लग्न ठरू शकते. सरकारी क्षेत्राशी संबंधित काम पूर्ण होतील. कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकता. परीक्षा-मुलाखत देणाऱ्या लोकांना यश मिळेल. 

धनू रास - गुप्त शत्रू वाढतील. लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. वादापासून दूर राहिलेलेच बरे. पैसे उधार देण्यापासून बचाव करा. लांब प्रवासावर जाऊ शकता. 

अधिक वाचा - जाणून घ्या अशी झाली जागतिक सायकल दिनाची सुरुवात

मकर रास - मकर राशीच्या लोकांसाठी ही वेळ चांगली आहे. परीक्षा-मुलाखत देणाऱ्या लोकांना यश मिळेल. नवी कामे सुरू होऊ शकतात. कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकता. प्रेम वाढेल. 

कुंभ रास - काही गोष्टी अप्रत्यक्षपणे कामे होतील. वाहन खरेदी करू शकता. आई-वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. सरकारी कामे पूर्ण होतील. चांगली बातमी मिळू शकते. कोणत्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल. 

मीन रास - बुधाची चाल तुमच्यासाठी शुभ आहे. या दरम्यानजी कामे सुरू कराल ती पूर्ण करूनच थांबाल. धर्मामध्ये आवड निर्माण होईल. दान-पुण्य कराल. परदेशाशी संबंधित कामे पूर्ण होतील. संतान सुख मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी