Budh Gochar Tula 2022 : बुध होणार तूळ राशीत गोचर, या चार राशींचे फळफळणार नशीब, होणार धनलाभ

Budh Gochar Tula 2022 : बुधवार 26 ऑक्टोबरला बुध ग्रह कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शनिवार 19 नोव्हेंबर पर्यंत बुध ग्रह तूळ राशीत राहणार आहे. त्यानंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत परिवर्तन करणार आहे. बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार असल्याने चार राशींचे नशीब फळफळणार आहे. या राशींवर लक्ष्मी माता प्रसन्न होणार असून त्यांना धनलाभ होणार आहे.

Mercury Transit 2022
बुध ग्रहाचा तूळ राशीत गोचर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बुधवार 26 ऑक्टोबरला बुध ग्रह कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
  • शनिवार 19 नोव्हेंबर पर्यंत बुध ग्रह तूळ राशीत राहणार आहे.
  • त्यानंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत परिवर्तन करणार आहे.

Budh Gochar Tula 2022 : बुधवार 26 ऑक्टोबरला बुध ग्रह कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शनिवार 19 नोव्हेंबर पर्यंत बुध ग्रह तूळ राशीत राहणार आहे. त्यानंतर बुध ग्रह वृश्चिक राशीत परिवर्तन करणार आहे. बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार असल्याने चार राशींचे नशीब फळफळणार आहे. या राशींवर लक्ष्मी माता प्रसन्न होणार असून त्यांना धनलाभ होणार आहे. त्यांना आगामी काळात यश मिळणार आहे. जाणून घेऊया बुध गोचरमुळे कुठल्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. (mercury transit in libra october 2022 these four zodiac sign financially benefits in budh gochar kal read in marathi)

बुध गोचरचा मिथून राशीवर प्रभाव

बुध ग्रहाचा तूळ राशीत गोचरमुळे त्यांचा आगामी काळ अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळणार आहे आणि उत्पन्नही वाढणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळणार आहे. तसेच घरात मान सन्मानही वाढणार आहे. 

अधिक वाचा :   Lucky moles: शरीरावर ‘या’ ठिकाणी तीळ असणं हे सौभाग्याचं लक्षण, वाचा सविस्तर

बुध गोचरचा कर्क राशीवर परिणाम

बुध ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश करणार असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना कौटुंबिक शांतता मिळणार आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी उत्पन्न वाढेल. तसेच व्यापारात यश मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे आगामी काळात समस्यांचे निराकारण होणार आहे. 

अधिक वाचा : Chanakya Niti: या स्थितीत पत्नी आणि पैशांना नका देऊ जास्त महत्त्व; अन्यथा गमावाल आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट

बुध गोचरचा सिंह राशीवर परिणाम

बुध गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांचे त्यांच्या बहीण आणि भावांसोबतचे नाते दृढ होणार आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांचा घरात दबदबा वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि उत्पन्नात वाढ होईल. धर्मकार्यात मन लागेल. समाजातही मान उंचावेल असे कार्य हातून घडेल. 

अधिक वाचा :  Shani Dev: शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी शनिवारी सूर्यास्तानंतर करा हे काम...

बुध गोचरचा धनू राशीवर परिणाम

बुध गोचरमुळे धनू राशीच्या लोकांना जुन्या मित्राची किंवा मैत्रिणीची भेट होईल. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतील होईल. या काळात धनू राशीच्या लोकांना पैसे कमवाण्याचा संधी चालून येतील. तसेच जुन्या समस्या सुटतील आणि त्यामुळे मनाला शांती मिळेल. बुध गोचरमुळे धनू राशीच्या लोकांना कौटुंबिक सुख आणि शांतता मिळणार आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांना चांगली बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी