Mercury Transit in Virgo 2022 : बुध होणार कन्या राशीत गोचर, या पाच राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मी प्रसन्न

२१ ऑगस्टला बुध  ग्रह कन्या राशीत गोचर म्हणजेच प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हे आकर्षक व्यक्तीमत्त्वाचे प्रतीक मानले गेले आहे. बुध गोचरमुळे काही राशींना फायदा होणार आहे. त्यांच्यावर लक्ष्मीमाता प्रसन्न होणार असून शिक्षणासह अनेक क्षेत्रात शुभ वार्ता ऐकायला मिळणार आहे.

budh gochar
बुध होणार कन्या राशीत गोचर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २१ ऑगस्टला बुध  ग्रह कन्या राशीत गोचर म्हणजेच प्रवेश करणार आहे.
  • ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हे आकर्षक व्यक्तीमत्त्वाचे प्रतीक मानले गेले आहे.
  • बुध गोचरमुळे काही राशींना फायदा होणार आहे.

Mercury Transit in Virgo 2022 : २१ ऑगस्टला बुध  ग्रह कन्या राशीत गोचर म्हणजेच प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हे आकर्षक व्यक्तीमत्त्वाचे प्रतीक मानले गेले आहे. बुध गोचरमुळे काही राशींना फायदा होणार आहे. त्यांच्यावर लक्ष्मीमाता प्रसन्न होणार असून शिक्षणासह अनेक क्षेत्रात शुभ वार्ता ऐकायला मिळणार आहे. जाणून घेऊया बुध गोचरमुळे कुणाचा फायदा होणार आहे.  (Mercury Transit in Virgo 2022  budh gochar five rashi benefit in marathi )

वृषभ राशिवर बुध गोचरचा प्रभाव

बुधर गोचरमुळे मिथून राशीच्या लोकांना शिक्षणात फायदा होणार आहे. जर मिथून राशीच्या लोकांना शैक्षणिक कार्यात किंवा अभ्यासात अडचणी येत असतील तर या गोचर काळात त्यांच्या अडचणी दूर होतील. प्रेमातही सकारात्मक बदल होती. तार्किक क्षमता वाढेल आणि वाद विवादात तुमचा विजय होईल. या काळात असंतुलित आहार घेऊ नका अन्यथा आरोग्याच्या अडचणींचा सामना करावा लागेल. 

मिथुन राशीवर बुध गोचरचा प्रभाव

गोचर काळात मिथून राशीच्या लोकांना भाग्य साथ देईल. या काळात कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. आईची तब्येत उत्तम राहील. तसेच उद्योग व्यवसायात प्रगती होईल. अनुभवी लोक आपल्या नवा व्यवसाय सुरू करू शकतात, त्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. 


सिंह राशीवर बुध गोचरचा प्रभाव 

बुध गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. स्पष्ट स्वभावामुळे तुमचा फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जे लोक राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांना नवीन बदल पहायला मिळेल. वडिलांकडून आर्थिक लाभ होईल. जवळच्या लोकांचे मार्गदर्शन मिळेल आणि त्यामुळे यशही मिळले. 


कन्या राशीवर बुध गोचरचा प्रभाव

बुध ग्रह हा कन्या राशीत गोचर होणार आहे. या काळात कन्या राशीचे लोक आणखी स्ट्रॉंग होतील. या काळात तुमचा आत्मविश्वास दुणावेल. करीअरमध्ये प्रगती होईल. मिथून राशीचे जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. तसेच जोडीदाराच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. 


वृश्चिक राशीवर बुध गोचरचा प्रभाव

वृश्चिक राशीच्या लोकांना या गोचरचा फायदा होणार आहे. मोठ्या बहीणीचे किंवा भावाचे सहकार्य मिळेल आणि आर्थिक प्रगती होईल. जे लोक करीअरविषय संभ्रमात असतील त्यांना योग्य दिशा मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. वृश्चिक राशीची महिला या काळात आपला व्यवसाय सुरू करू शकता. जोडीदारासोबत प्रेम वाढेल, चांगला वेळ व्यतीत कराल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी