Budh Gochar 2022 : प्रत्येक ग्रह/तारा/नक्षत्र प्रत्येक राशीत विशिष्ट कालावधीसाठी असतो. यालाच संबंधित ग्रहाचे/ताऱ्याचे/नक्षत्राचे त्या त्या राशीतले गोचर म्हणून ओळखले जाते. सूर्य, शुक्र, बुध प्रत्येक राशीत एक महिना तर चंद्र प्रत्येक राशीत सव्वा दोन दिवस गोचर करतो. मंगळ प्रत्येक राशीत ५७ दिवस तर गुरु प्रत्येक राशीत एक वर्ष गोचर करतो. राहू आणि केतू प्रत्येक राशीत दीड वर्ष तर शनि (शनी) प्रत्येक राशीत अडीच वर्ष गोचर करतो.
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय
बुध ग्रह रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी कन्या राशीत गोचर करणार आहे. बुध ग्रहाचे हे राशी परिवर्तन वृषभ, मिथुन, सिंह आणि कन्या या चार राशींच्या नागरिकांसाठी भाग्योदयाचे निमित्त ठरणार आहे. बुध गोचर होणार असल्यामुळे वृषभ, मिथुन, सिंह आणि कन्या राशीच्या नागरिकांना आर्थिक लाभ होईल. त्यांची करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल. काहींना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यवस्थित नियोजन केले तर बुध गोचर झाल्यानंतर वृषभ, मिथुन, सिंह आणि कन्या राशीच्या नागरिकांना लवकरच मोठा फायदा होईल. या फायद्यासाठी वृषभ, मिथुन, सिंह आणि कन्या राशीच्या नागरिकांनी योग्य संधीची वाट बघावी. संधी मिळताच ती लगेच साधावी. महत्त्वाचे म्हणजे शब्दांचा वापर विचारपूर्वक करावा.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.