'या' 6 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार चमत्कारिक बदल, तुमची रास काय? 

Budh Vakri: बुध वक्रीचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. काही राशींसाठी याला मोठा फायदा होतो तर काही राशींसाठी थोडं त्रासदायक ठरू शकतं. 

miraculous changes will seen in life of these 6 zodiac sign read in marathi
'या' 6 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार चमत्कारिक बदल, तुमची रास काय? 
थोडं पण कामाचं
  • 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत बुध ग्रह कन्या राशीत वक्र
  • 26 ऑक्टोबर 2022 रोजी बुध ग्रह हा तूळ राशीत

Horoscope in Marathi: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा वाणी, संवाद आणि व्यापारासाठी चांगला मानला जातो. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत बुध ग्रह कन्या राशीत वक्री अवस्थेत राहणार आहे. त्यानंतर बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. 26 ऑक्टोबर 2022 रोजी बुध ग्रह हा तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत कोणत्या राशींवर त्याचा काय परिणाम होईल आणि कोणाचं नशीब फळफळणार आहे जाणून घ्या. (miraculous changes will seen in life of these 6 zodiac sign read in marathi)

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today

तुमच्या राशीत पाचव्या घरात बुध ग्रहाची वक्री चाल शुभ राहील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. पैशांच्या व्यवहारांच्या बाबतीत काळजी घ्या. संतान सुख मिळण्याचा योग आहे. शैक्षणिक बाबतीत संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम आहे.

हे पण वाचा : नवरात्र 2022 : नऊ दिवसांच्या उत्सवाची सुरूवात

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today

या राशीच्या व्यक्तींच्या राशीत चौथ्या घरात बुध वक्री होणे लाभदायक असेल. परिवारातील सदस्यांसोबत नाते-संबंध आणखी घट्ट होतील. सुख-सुविधांमध्ये अधिक विस्तार होईल. तुम्ही कार्यरत असलेल्या क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. संयम बाळगा आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. 

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today

तुमच्या राशीत 11व्या स्थानी बुधाचे वक्री होणे हे खूपच शुभ मानले जात आहे. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. अपूर्ण आणि रखडलेले काम मार्गी लागेल. व्यापारात मोठा नफा होईल. तब्येतीची काळजी घ्या.

हे पण वाचा : या तेलाने टक्कल होईल दूर अन् केस येतील वेगाने​

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today

या राशीच्या दहाव्या घरात बुधाचं वक्री होणं तुमच्यासाठी प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येईल. नोकरी करणाऱ्यांना चांगले यश प्राप्त होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. 

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today

या राशीच्या नवमीत बुधाचे वक्री होणे तुम्हाला चांगला लाभ देईल. भाग्य तुम्हाला उत्तम साथ देईल. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात प्रवास करणे टाळा. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

हे पण वाचा : या 3 मार्गांनी मिळवलेला पैसा माणसाकडे कधीच टिकत नाही

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today

या राशीच्या व्यक्तींच्या सातव्या घरात बुधाचं वक्री होणं तुमच्यासाठी लाभदायक होऊ शकते. पार्टनरशिप संबंधित कामात यश मिळेल. बोलण्यावर संयम ठेवा. ताण-तणावातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी