मुंबई: अंकज्योतिषानुसार(numerology) अंक(number) आपल्या जीवनात मोठी भूमिका बजावतात. याचा परिणाम आपल्या जीवनावर(life) होतो. हा परिणाम खूप खोलवर असतो. काही अंक एखाद्या व्यक्तीसाठी शुभ असतात तर काही व्यक्तींसाठी अशुभ असतात. ५, १४ आणि २३ तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींचा मूलांक ५ आहे. सोबतच ५ या अंकावर बुध ग्रहाचे अधिपत्य असते. तर वार्षिक अंक ६ म्हणजे शुक्र ग्रहासोबत बुध ग्रहाची पारस्परिक मित्रतेचा योग बनतो. अशातच मूलांक ५ असलेल्या व्यक्तींसाठी २०२२ हे वर्ष चांगले राहणार आहे. मूलांकसोबतच वार्षिक अंकाचा ताळमेळ पूर्ण वर्ष तुमच्या भाग्यासाठी चांगले मानले जाईल.moolank 5 people will get more benefit in year 2022
हे वर्ष मूलांक ५ असलेल्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये चांगले यश मिळेल. आयटी, वकिली आणि प्रिंटिंग प्रेसशी संबंधिक लोकांना या वर्षी फायदा होईल. सोबतच जी व्यक्ती न्यायालयीन परीक्षांची तयारी करत आहे त्यांना यश मिळणार आहे. सोबतच नव्या उद्योगाची तुमची कल्पना प्रत्यक्षात येईल. हे वर्ष गुंतवणुकीसाठी अतिशय अनुकूल आहे. जमीन अथवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत आहात तुम्ही यावर्षी करू शकता.
वैवाहिक जीवनासाठी हे नवे वर्ष अनुकूल असणार आहे. जोडीदारांमध्ये जवळीक वाढेल. संतान सुख मिळेल. पार्टनरसोबत तुम्ही एखादा बिझनेस सुरू करू शकता. या वर्षी प्रत्येक कामात यश मिळेल. मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फ्लॅट अथवा जमीन खरेदी करू शकता.
मूलांक ५ असलेल्या व्यक्तींना त्वचेसंबंधित समस्येचा त्रास सहन करावा लागू शकतो. सोबतच मार्च महिन्याच्या जवळपास गळ्याची समस्या होऊ शकते. अशातच नियमितपणे व्यायाम करा ज्यामुळे तुम्ही स्वस्थ राहील. वर्षाच्या मध्यावधीत सर्दी, पडसे आणि छातीत इन्फेक्शन यासारख्या समस्या सतावू शकतात.
२०२२ या वर्षात शनी मकर राशीत त्रिग्रही योग बनवत आहे. शनी ग्रह आधीपासून मकर राशीत स्थित आहे ५ जानेवारीला बुधही या राशीत पोहोचणार आहे आणि यानंतर १४ जानेवारीला सूर्यही मकर राशीत गोचर करत आहे. मकर राशीत शनी, सूर्य आणि बुध या ग्रहांच्या युतीने त्रिग्रही योग बनत आहे. हा योग काही राशींसाठी अशुभ असणार आहे तर काही राशींसाठी शुभ असणार आहे.