Numerology: अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांवर माता लक्ष्मीची असते कृपा, कधीही भासत नाही पैशाची कमतरता.

Numerology: या राशीचे लोक भाग्याचे धनी मानले जातात. ज्या कामात हात घालतात त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्याकडे कधीही संपत्तीची कमतरता नसते.

Lakshmi's grace is on them, there is no shortage of money
यांच्यावर असते माता लक्ष्मीची कृपा, भासत नाही पैशांची कमतरता 
थोडं पण कामाचं
  • 4,13,22 आणि 31 या जन्मतारखेच्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा
  • 4 मूलांक असणारे भाग्याचे धनी मानले जातात
  • कधीच भासत नाही पैशांची कमतरता


Numerology: अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 4 मानला जातो. या राशीचे लोक भाग्याचे धनी मानले जातात. ज्या कामात हात घालतात त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्याकडे संपत्तीची कधीही कमतरता नसते. त्यांच्यावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा मानली जाते. हे लोक खूप मेहनती असतात. ते आयुष्यात चांगले पैसे कमावतात.


ते स्वतः आनंदी राहतात आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे खूप मित्र असतात आणि त्यांच्या मित्रांनाही खूप फायदा होतो. 
मात्र त्या बदल्यात त्या मित्रांकडून 4 मूल्यांक असणाऱ्यांना कोणताही लाभ मिळत नाही. लोक नेहमी असं काही काम करतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. त्यांना प्रत्येक विषयाची माहिती ठेवायला आवडते. ते खूप पैसे कमवतात आणि खर्चही तितकाट करतात. हे लोक कोणावरही पटकन विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांची जवळच्यांकडून अनेकदा फसवणूक होण्याचीही शक्यता असते.

4 क्रमांकाचा स्वामी राहू मानला जातो. त्यामुळे या राशीच्या लोकांवर या ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव असतो. राशी 4 च्या लोकांमध्ये अचानक कोणतीही घटना घडण्याची शक्यता आहे. त्यांना अचानक फायदा झाला तर तोटाही होतो. हे लोक वक्तशीर मानले जातात. कोणतेही काम वेळेत पूर्ण करायला त्यांना आवडते. त्यांना शिस्त आवडते. ते थोडे आक्रमक आणि भांडखोर स्वभावाचे देखील आहेत, ज्यामुळे त्यांचे शत्रू लवकर बनतात. ते प्रत्येक परिस्थितीशी सहज जुळवून घेत नाहीत.

4 हा मूल्यांक असणाऱ्यांना सामाजिक कार्यात प्रचंड रस आहे. समाजाच्या हितासाठी ते सतत काहीतरी करत असतात. हे लोक आपल्या मनातली गोष्ट कोणालाही पटकन सांगत नाहीत. पण ते इतरांच्या मनातील गोष्टी पटकन जाणून घेण्यात पारंगत असतात. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्याही असतात, ज्याचा यांना अनेकदा त्रासही होतो. 


डिस्क्लेमर : येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. timesnowmarathi.com कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणास, माहितीला मान्यता देत नाही. कोणतीही माहिती किंवा गृहितक लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी