राशीभविष्य : बुधवार, १३ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या नवरात्रीच्या सातव्या माळेचे तुमचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य,१३ ऑक्टोबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

navratri seventh day rashi bhavishaya 13 october 2021 daily horoscope
नवरात्रीच्या सातव्या माळेचे तुमचे भविष्य 

थोडं पण कामाचं

  • कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.
  • कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आनंदाची वार्ता मिळेल.
  • मकर / Capricorn Horoscope Today: कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व्यस्त राहाल.

आजचे राशी भविष्य १३ ऑक्टोबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? ( navratri seventh day rashi bhavishaya 13 october 2021 daily horoscope  )

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रलंबित कार्य पूर्ण झाल्यानं आनंद होईल. प्रवासाचा योग आहे. वादविवादापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत यश आणि प्रगतीची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये तणाव असेल. वैवाहिक सुख मिळेल. आरोग्याच्या समस्या जाणवतील. शुभ रंग - लाल. 
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरीत प्रगती किंवा बदलच्या दिशेनं पुढे जाल. राजकारणात मिळालेल्या लाभामुळे आनंदी असाल. पैसाचं आगमन निश्चित आहे. जीवन साथीदाराच्या सहकार्याने आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल. शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कोणालाही पैसे देण्यापूर्वी विचार करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. रखडलेले काम मार्गी लागेल. प्रेमपूर्ण वैवाहिक जीवन आपल्याला आनंदी ठेवेल. आरोग्य चांगले असेल. व्यापारात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. आरोग्याचा पाया कमजोर असू शकतो. उतावळेपणा नको. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सतर्कता ठेवा. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील. शुभ रंग - पिवळा. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आधीच्या मेहनतीचे फळ आता मिळेल. धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी प्रसन्नता तसेच उत्साह असेल. मित्र तसेच नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. घरात तसेच बाहेर कामाचे कौतुक होईल. पैसा खेळता राहील. शुभ रंग - लाल.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आनंदाची वार्ता मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. आत्मसन्मान वाढेल. शत्रू सक्रिय राहतील. व्यापार-व्यवसायात अनुकूल लाभ होतील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. उत्साह तसेच प्रसन्नतेने काम करू शकाल. वादविवाद नको. शुभ रंग - केशरी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न सफल होतील. आर्थिक स्थिती योग्य राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. चिंतेचे तसेच तणावाचे वातावरण नसेल. प्रसन्नता कायम राहील. शुभ रंग - हिरवा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक समीकरणे बिघडू शकतात. कर्ज घ्यावे लागू शकते. दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका. कामे विलंबाने होतील. चिंता तसेच तणावाचे वातावरण राहील. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानता बाळगा. शुभ रंग - पांढरा. 
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: पैसे मिळण्याची शक्यता आहे. यश मिळण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मान-सन्मान मिळेल. इन्कमचे स्त्रोत वाढतील. भाग्याची साथ मिळेल. सगळीकडून सहकार्य मिळेल. थकवा जाणवेल. शुभ रंग - पिवळा.
  10. मकर / Capricorn Horoscope Today: कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात व्यस्त राहाल. राजकारणात नवी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - निळा.
  11. कुंभ / Aquarius Horoscope Today: कोणत्याही नव्या कार्यचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांना विवाहाचे मार्गात येणाऱ्या समस्या समाप्त होतील. शुभ रंग - लाल
  12. मीन / Pisces Horoscope Today: बऱ्याच योजना आपल्या  मनावर परिणाम करतील. लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा स्रोत देखील वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात नफा होईल. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी