Baba Vanga: ही 19 वर्षांची मुलगी बनली नव्या युगातील बाबा वेंगा, 2022 मधील 10 भाकितं ठरली खरी!

Hannah Carroll Prediction: अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये राहणारी हॅना कॅरोल (Hannah Carroll) केवळ 19 वर्षांची आहे, परंतु ती ज्या भविष्यवाणी करत आहे त्यामुळे ती सध्या खूप चर्चेत आहे. अनेक जण तिला नवीन युगाचा बाबा वेंगा असं म्हणत आहेत.

new age baba venga becomes 19 year old girl 10 predictions in 2022 are perfect
Baba Vanga: ही 19 वर्षांची मुलगी बनली नव्या युगातील बाबा वेंगा, 2022 मधील 10 भाकितं ठरली खरी!  
थोडं पण कामाचं
  • 19 वर्षीय हॅना कॅरोलने जानेवारीमध्ये 2022 साठी 28 भविष्यवाणी लिहून ठेवल्या आहेत
  • हॅरी स्टाइल्स आणि बेयॉन्सचे नवीन अल्बम, रिहाना गरोदर राहणे आणि प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या बाळाचे स्वागत करणे असेही तिने अंदाज वर्तवले होते
  • हॅनाने किम कार्दशियन आणि पीट डेव्हिडसन यांच्या विभक्त होण्याचा अंदाजही अचूक वर्तवला होता

Baba Venga Predictions: बल्गेरियात (Bulgaria) जन्मलेल्या बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांची नेहमीच चर्चा होते आणि आतापर्यंत त्यांची अनेक भविष्यवाणी खरी ठरली आहे. आता बाबा वेंगा यांच्यासारखी मुलगी समोर आली आहे, जी भविष्यवाणी करते आहे. हॅना कॅरोल (Hannah Carroll) या 19 वर्षांच्या मुलीने 2022 या वर्षांसाठी 28 मोठ्या भविष्यवाणी केल्या होत्या, त्यापैकी 10 भविष्यवाणी या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. (new age baba venga becomes 19 year old girl 10 predictions in 2022 are perfect)

हॅना कॅरोलची खरी ठरली आहे भविष्यवाणी 

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथे राहणारी हॅना कॅरोल ही केवळ 19 वर्षांची असली तरी ती ज्या पद्धतीने भविष्य वर्तवत आहे. त्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. हॅना कॅरोल हिने 2022 च्या सुरुवातीला राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. या वर्षाच्या जानेवारीमध्ये हॅनाने जे भविष्य वर्तवलं आहे त्यात तिने किम कार्दशियनचं ब्रेकअप, हॅरी स्टाइल्स आणि बियॉन्सेचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्रा यांच्या आई बनण्याबाबतचं भविष्य वर्तवलं होतं. जे खरं ठरलं आहे.

अधिक वाचा: Chanakya Niti: तुम्हाला माहिती आहे का? बायका भरगर्दीतही पुरुषांच्या या सवयींकडे देतात लक्ष

हॅना कॅरोलच्या 'या' भविष्यवाणीकडे सगळ्यांचं लक्ष

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 19 वर्षीय हॅना कॅरोलचे बहुतेक अंदाज पॉप कल्चर किंवा सिनेमा इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, ज्याकडे आगामी काळात सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. 2022 साठी हॅनाने जे भविष्य वर्तवलं आहे त्यात केंडाल जेनरचा साखरपुडा, हेली बीबरचं गरोदर असणं, टायलर स्विफ्टची लग्न किंवा साखरपुडा आणि वन डायरेक्शन बँड यांचं रियूनियन या गोष्टींचा समावेश आहे.

अधिक वाचा: Astro Tips: 'हे' एक फूल बदलेल तुमचं नशीब, आजचं घराच्या कोपऱ्यात लावा रोप

हॅना म्हणजे नव्या युगातील बाबा वेंगा!

बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी 20 व्या शतकात अनेक भविष्यवाण्या केल्या आणि आता लोक हॅना कॅरोलला 21 व्या शतकातील बावा वेंगा म्हणून संबोधत आहेत. जिने आतापर्यंत अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. ज्या काही अंशी खऱ्या देखील ठरत आहेत.

अधिक वाचा: Sun Transit in Libra :  सुर्य ग्रह तूळ राशीत करणार प्रवेश, या राशींचे उजळणार भाग्य

हॅना म्हणते की, तिला पॉप कल्चर आणि सेलेब्समध्ये जास्त रस आहे, म्हणूनच तिच्या बहुतेक भविष्यवाणी या त्यांच्याबाबतच असतात. हॅनाचं म्हणणं आहे की, यंदाच्या वर्षी जर तिचे कोणतेही भाकीत खरे ठरले नाही तरी येत्या काही वर्षांत ते नक्कीच खरे ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी