Weekly Numerology Horoscope: या लोकांसाठी वरदान असणार पुढील आठवडा; जाणून घ्या कोण होणार मालामाल 

भविष्यात काय
Updated May 28, 2022 | 12:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weekly Numerology Horoscope । येणारा आठवडा मूलांक क्रमांक २ मधील लोकांना गुप्त धन घेऊन येईल. तर मूलांक ६ मधील लोकांना नशीबाची साथ मिळेल.

Next week will be a boon for these people
या लोकांसाठी वरदान असणार पुढील आठवडा, कोण होणार मालामाल?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • येणारा आठवडा मूलांक क्रमांक २ मधील लोकांना गुप्त धन घेऊन येईल.
 • मूलांक ६ मधील लोकांना नशीबाची साथ मिळेल.
 • कशास्त्रामध्ये जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीचा मूलांक क्रमांक ठरवला जातो.

Weekly Numerology Horoscope । मुंबई : येणारा आठवडा मूलांक क्रमांक २ मधील लोकांना गुप्त धन घेऊन येईल. तर मूलांक ६ मधील लोकांना नशीबाची साथ मिळेल. अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीचा मूलांक क्रमांक ठरवला जातो. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक हा १ असेल. चला तर म जाणून घेऊया ज्योतिषांकडून पुढील आठवडा सर्व राशीतील लोकांसाठी कसा जाईल. (Next week will be a boon for these people). 

अधिक वाचा : म्हणून गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनणे कठीण, वाचा सविस्तर

 1. मूलांक १ - या आठवड्यात तुम्ही तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा अनुभवाल. जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील आणि तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
 2. मूलांक २ - या आठवड्यात गुप्त धन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभामुळे मन प्रसन्न राहील. भावनिक स्वभाव असल्यामुळे कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.
 3. मूलांक ३ - या आठवड्यात विरोधकांचा पराभव करून तुम्ही विजयाचा गुलाल उधळाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वडिलांकडून चांगली बातमी मिळेल. बोलत असताना अहंकारावर नियंत्रण ठेवणे चांगले ठरेल.
 4. मूलांक ४ - या आठवड्यात प्रवास आणि धावपळ होईल. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने मन अस्वस्थ होईल. जास्त खर्चामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. प्रवासातून लाभ मिळेल.
 5. मूलांक ५ - कौटुंबिक समस्यांमुळे या आठवड्यात तुम्ही तणावात असाल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. काही शुभ कार्यात सहभागी व्हाल. कोणतीही मशिनरी चालवताना किंवा इलेक्ट्रिकल काम करताना काळजी घ्या.
 6. मूलांक ६ - या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहचलेला असेल. नशीब तुमची साथ देईल आणि काही जुनी रखडलेली कामेही होताना दिसतील. जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. पोट आणि गुप्तांगांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील.
 7. मूलांक ७ - या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीशी भेट झाल्याने तुमचे मन उत्साही राहील. आठवड्याच्या मध्यात लाभामुळे मन प्रसन्न राहील. आठवड्याच्या शेवटी आरोग्याच्या समस्यांमुळे कुटुंबात धावपळ होईल.
 8. मूलांक ८ - या आठवड्यात तुमची कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. प्रेम संबंध मजबूत होतील आणि तुम्हाला भेटवस्तू देखील मिळतील. घर आणि वाहन दुरुस्तीसाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. पोटाच्या समस्यांबाबत विशेष काळजी घ्या.
 9. मूलांक ९ - या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अतिरिक्त आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व कामात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील पण मुलांच्या आरोग्याची समस्या सतावत राहील. 

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी