Numerology Number 9 Horoscope 2022: जन्मांक ९ साठी गुंतवणूक फायद्याची ठरेल, 'हे' महिने लाभदायी

भविष्यात काय
Updated Jan 01, 2022 | 19:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology Number 9 Horoscope 2022 : जन्मांक ९ असलेली व्यक्ती संरक्षण क्षेत्रात, राजकारणात, व्यवस्थापन क्षेत्रात, एखाद्या ठिकाणी नेतृत्व करण्याची वेळ येते तेव्हा, आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरते. या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये जन्मांक ९ असलेल्या व्यक्ती प्रगती करतील. नोकरी असो वा व्यवसाय आपल्या प्रगतीचे योग आहेत.

Numerology Number 9 Horoscope 2022
जन्मांक ९ : गुंतवणूक फायद्याची ठरेल, 'हे' महिने लाभदायी 
थोडं पण कामाचं
  • ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८, २७ यापैकी एखाद्या दिवशी झाला आहे त्याचा जन्मांक ९
  • जन्मांक ९ चा स्वामी मंगळ
  • या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये जन्मांक ९ असलेल्या व्यक्ती प्रगती करतील

Numerology Number 9 Horoscope 2022 (अंक ज्योतिष राशीभविष्य 2022): ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८, २७ यापैकी एखाद्या दिवशी झाला आहे त्याचा जन्मांक ९ असेल. जन्मांक ९ चा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रह आत्मबल वाढवतो. राजकारणात प्रगतीची संधी मिळवून देतो. नेतृत्व गुण विकसित करतो. लोकप्रियता मिळवून देतो. आर्थिक सुबत्ता मिळवून देतो. जन्मांक ९ असलेली व्यक्ती संरक्षण क्षेत्रात, राजकारणात, व्यवस्थापन क्षेत्रात, एखाद्या ठिकाणी नेतृत्व करण्याची वेळ येते तेव्हा, आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरते. या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये जन्मांक ९ असलेल्या व्यक्ती प्रगती करतील. नोकरी असो वा व्यवसाय आपल्या प्रगतीचे योग आहेत. हे वर्ष आपल्यासाठी लाभदायी आहे. २०२२ या वर्षावर ६ चा प्रभाव आहे आणि ६ चा स्वामी शुक्र ग्रह आहे.

जन्मांक ९ असलेल्या व्यक्तीचे अंक ज्योतिषाआधारे भविष्य २०२२

  1. आरोग्य - १५ फेब्रुवारी २०२२ ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत बाहेरचे खाणे आणि अनावश्यक प्रवास टाळा. तब्येत सांभाळा. मे महिन्यात रक्ताशी संबंधित एखादा आजार अथवा डोळ्यांशी संबंधित समस्या त्रास देण्याची शक्यता आहे. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण याची काळजी घ्या. नोव्हेंबर २०२२ मध्ये वाहन जपून चालवा. कोणत्या वाहनातून आणि कधी प्रवास करावा याबाबतचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
  2. नोकरी अथवा व्यवसाय - फेब्रुवारी २०२२ आणि डिसेंबर २०२२ हे दोन महिने आपल्यासाठी प्रगतीचा कालावधी आहे. मीडिया, टीव्ही, व्यवस्थापन, बँकिंग या क्षेत्रातील व्यक्तींची प्रगती होईल. मार्च २०२२ आणि डिसेंबर २०२२ या दोन महिन्यांमध्ये नोकरीत बदलाची शक्यता आहे. बँकिंग आणि प्रशासकीय कारभाराशी संबंधित असलेल्या ९ जन्मांकाच्या व्यक्तींची प्रगती होईल. २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. मार्च २०२२ ते १८ नोव्हेंबर २०२२ हा कालावधी प्रगतीसाठी चांगला आहे. नोकरी बदलण्यासाठी एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ हा उत्तम कालावधी आहे. 
  3. लव्ह लाइफ आणि दांपत्यजीवन - लव्ह लाइफ उत्तम आहे. जन्मांक ९ असलेल्या ज्या व्यक्तींचे लग्न अद्याप झालेले नाही अशांसाठी मे ते नोव्हेंबर २०२२ हा कालावधी लग्नासाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवनात सुखी व्हाल.
  4. आर्थिक स्थिती - व्यवसायात असल्यास आर्थिक फायदा होईल. नोकरीत असल्यास उत्पन्न वाढेल. गुंतवणूक फलदायी ठरेल. जुलै २०२२ अथवा नोव्हेंबर २०२२ या दोन महिन्यांत जमीन अथवा घराची खरेदी करू शकता.
  5. शुभ अशुभ वेळ - मार्च, सप्टेंबर, डिसेंबर हे तीन महिने शुभ आहेत.
  6. उपाय - मंगळाचा आणि शुक्राचा जप करा. लाल फळांचे दान करा. हनुमानबाहुकचे पठण करा. दर मंगळवारी सुंदरकांडाचे पठण करा. अन्नदान करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी