Numerology 2023: मूलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी नववर्षात सुवर्णसंधी, नशीब फळफळणार

mulank 2 people career, marriage, love life, personality, business prediction for year 2023: ज्या व्यक्तीची जन्म तारीख 2, 11, 20 आणि 29 असते त्यांचा मूल्यांक 2 असतो. या मूल्यांकाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. मूलांक 2 असलेल्या व्यक्ती खूप हुशार असतात. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Number 2 numerology 2023 prediction read in marathi: अंकशास्त्रानुसार वर्ष 2023 हे मूल्यांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी खूप चांगले असणार आहे. या वर्षात काही प्रतिकूल क्षण सुद्धा येण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जास्त असेल आणि त्यामुळे मानसिक तणाव जावण्याची शक्यता आहे. तुम्हाला काम आणि आपलं आयुष्य यांच्यात संतुलन ठेवण्यासाठी चांगली मॅनेजमेंट स्किल आपल्यात विकसित करण्याची गरज आहे. करिअर आणि धनलाभाच्या बाबतीत नववर्ष खूपच चांगले असेल. (numerology 2023 mulank number 2 people will have a golden opportunity next year read details in marathi)

मूलांक 2 असलेल्यांचं 2023 मध्ये कसं असेल करिअर

करिअरच्यादृष्टीने हे वर्ष खूपच चांगले असणार आहे. ज्या व्यक्तींना परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांचं स्वप्न यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण करिअरमध्ये लहान-मोठे चढ-उतार पाहण्याची शक्यता आहे. प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. कामाचा ताण जाणवेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हे वर्ष चांगले राहील. नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

हे पण वाचा : टाचांना पडलेल्या भेगा या उपायांनी झटक्यात होतील दूर

मूलांक 2 असलेल्यांची आर्थिकस्थिती कशी असेल?

या वर्षी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होईल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. यावर्षी तुम्ही पैशांची बचत करू शकाल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी एकूणच तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. 

हे पण वाचा : 31st December: थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी भारतातील उत्तम जागा

मूलांक 2 असलेल्यांची लव-लाईफ कशी असेल?

हे वर्ष तुमच्या लव लाईफच्यादृष्टीने (प्रेम संबंधांसाठी) चांगले राहील. प्रेमविवाहात कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळेल. जे व्यक्ती आपल्या पार्टनरच्या शोधात असतील त्यांना चांगला जोडीदार मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. विवाहित जोडप्यांसाठी हे वर्ष चांगले राहील. 

हे पण वाचा : हिप्सला मॉडेल सारखा शेप देण्यासाठी 6 सोप्या टिप्स

मूलांक 2 असलेल्यांसाठी शिक्षण क्षेत्र कसे असेल?

यावर्षी मूलांक 2 असलेले व्यक्ती शिक्षण क्षेत्रात यशस्वी होतील. सरकारी नोकरीच्या शोधात असलेले व्यक्ती यावर्षी नोकरी मिळवण्यात यशस्वी ठरतील. तुम्ही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. शिक्षण क्षेत्रात तुमचा रस वाढेल.

हे पण वाचा : बहुतेक स्वयंपाकघरात केली जाते ही चूक

मूलांक 2 असलेल्यांसाठी शुभ रंग, दिवस आणि क्रमांक

मूलांक 2 असलेल्यांसाठी शुभ रंग पांढरा आणि लाल आहे. शुभ अंक 2 आणि 9 आहे. शुभ दिवस सोमवार आणि मंगळवार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी