Numerology: या मुली संपत्तीच्या बाबतीत भाग्यवान असतात, वडिलांना बनवतात श्रीमंत

भविष्यात काय
Updated Apr 06, 2022 | 11:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology | कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख त्याच्यासाठी सर्वात खास असते. ज्याला आपण दरवर्षी आपला जन्मदिवस म्हणून साजरा करतो. लक्षणीय बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जन्मतारीख. ज्याच्या मदतीने तुम्ही व्यक्तीचा स्वभाव आणि सवयींबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता.

Numerology Girls born in the radix 3 are lucky in terms of wealth
या मुली संपत्तीच्या बाबतीत भाग्यवान असतात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्या मुलींची जन्मतारीख ३, १२, २१ आणि ३० आहे, त्यांचा मूलांक क्रमांक हा ३ आहे.
  • या मूलांकातील मुली भाग्यवान मानल्या जातात.
  • मूलांक ३ मधील मुली मेहनती आणि हुशार आहेत.

Astrology | मुंबई : कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख त्याच्यासाठी सर्वात खास असते. ज्याला आपण दरवर्षी आपला जन्मदिवस म्हणून साजरा करतो. लक्षणीय बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जन्मतारीख. ज्याच्या मदतीने तुम्ही व्यक्तीचा स्वभाव आणि सवयींबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. दरम्यान आज आपण अशाच काही जन्मतारीखांबद्दल भाष्य करणार आहोत, ज्या  तारखांना जन्मलेल्या मुली भाग्यशाली मानल्या जातात. (Numerology Girls born in the radix 3 are lucky in terms of wealth). 

अधिक वाचा : फीसाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणाऱ्या शाळेवर गुन्हा

अंकशास्त्रानुसार ज्या मुलींची जन्मतारीख ३, १२, २१ आणि ३० आहे, त्यांचा मूलांक क्रमांक हा ३ आहे. या मूलांकातील मुली भाग्यवान मानल्या जातात. त्या खूप स्वाभिमानी असतात. त्यांनी एखादे काम करायचे ठरवले की त्या ते काम पूर्ण करूनच शांत बसतात. त्यांना सगळीकडे सन्मान मिळतो. तसेच त्या नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. ते आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असतात. त्यांना पैशाशी संबंधित बाबींमध्ये नेहमी यश मिळते. 

अधिक वाचा : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का?

मूलांक ३ मधील मुली मेहनती आणि हुशार आहेत. कष्टाच्या जोरावर त्या आयुष्यात काहीही साध्य करू शकतात. या मुली ज्या कामात नशीब आजमवतात त्यात त्यांना नक्कीच यश मिळते. प्रत्येक कामात त्यांना नशीबाची साथ मिळत असते. त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यांचे जीवन सुखाने भरलेले असते. लक्षणीय बाब म्हणेज मूलांक ३ मधील मुली त्यांच्या पतीसाठी भाग्यवान मानल्या जातात. या राशीतील मुलीशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचे नशीब उजळते. या मूलांकातील मुलीही वडिलांसाठी भाग्यशाली मानल्या जातात. 

प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवण्यात ते यशस्वी होतात. नोकरी आणि व्यवसायात त्यांना यश मिळते. त्याच्यांत उत्तम नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला या मुली धैर्याने सामोरे जातात. तसेच त्या एक चांगल्या मार्गदर्शक देखील आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी