numerology horoscope 9 january 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला झाला असेल त्या सर्वांचा मूलांक ९ आहे. उद्या रविवार ९ जानेवारी २०२२ आहे. जाणून घ्या काय आहे आपल्या मूलांकाचे भविष्य...
अंकराशी : ९ जानेवारी रोजी 'या' तारखांना जन्मलेले साजरा करतील आनंद, दांपत्य जीवन होईल सुखी 
थोडं पण कामाचं
अंकराशी : ९ जानेवारी रोजी 'या' तारखांना जन्मलेले साजरा करतील आनंद, दांपत्य जीवन होईल सुखी
जाणून घ्या काय आहे आपल्या मूलांकाचे भविष्य...
कोणत्या मूलांकाचे काय आहे भविष्य?
numerology horoscope 9 january 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला झाला असेल त्या सर्वांचा मूलांक ९ आहे. उद्या रविवार ९ जानेवारी २०२२ आहे. जाणून घ्या काय आहे आपल्या मूलांकाचे भविष्य...
मूलांक १ - कामाच्या व्यापात दिवस निघून जाईल. सावधपणे कामं करा. अनुभवींच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घ्या. नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. हुशारीने स्पर्धा आणि संघर्ष आजच्या दिवशी टाळा. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
मूलांक २ - आजचा दिवस चढउतारांचा आहे. आर्थिक ताण वाढेल. आयत्यावेळी काही अडचणी येतील. डोकं शांत ठेवा. महत्त्वाची कामं पुढे ढकलणे हिताचे. काही कामं आज रखडतील. स्पर्धा, संघर्ष आणि वाद टाळा. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. मनःशांतीवर भर द्या.
मूलांक ३ - कामाच्या व्यापात दिवस निघून जाईल. नव्या योजनेचा आरंभ करायला हरकत नाही. आर्थिक लाभ होईल. दांपत्य जीवन सुखी राहील. मुलांकडून आनंदवार्ता कळेल. तब्येत सांभाळा.
मूलांक ४ - अडचणीत सहकाऱ्यांच्या साथीने मार्ग काढू शकाल. नव्या जबाबदाऱ्या व्यवस्थित हाताळाल. दिवस छान जाईल. मुलांकडून आनंदवार्ता कळेल. तब्येत सांभाळा.
मूलांक ५ - कामाच्या व्यापात दिवस निघून जाईल. नव्या योजनेची सुरुवात टाळा. अनुबवींचा सल्ला घ्या. कामासाठी प्रवास होईल. दांपत्य जीवन सुखी राहील. मुलांकडून आनंदवार्ता कळेल. तब्येत सांभाळा.
मूलांक ६ - दिवस चढउताराचा आहे. तब्येत सांभाळा. नव्या योजनेची सुरुवात टाळा. वाद टाळा. वाहन जपून चालवा. मनःशांती जपा. कौटुंबिक नाती जपण्यावर भर द्या.
मूलांक ७ - नव्या ओळखी होतील, कामासाठी आणि व्यवसायासाठी काळ बरा आहे. तज्ज्ञांचा सल्ला लाभदायी ठरेल. वाहन आणि यंत्र चालवताना काळजी घ्या. तब्येत जपा. दांपत्य जीवन सुखी राहील.
मूलांक ८ - काही कारणाने अस्वस्थता जाणवेल. वाद टाळा. कामासाठी बरा दिवस. नव्या योजना राबवणे टाळा. संयम पाळा. मर्यादीत आर्थिक लाभ होईल. स्वतःची आणि कुटुंबाची तब्येत जपा.
मूलांक ९ - दिवस आनंदाचा आहे. उत्साह वाढेल. अनेक महत्त्वाची कामं लवकर पूर्ण कराल. कष्टाचं फळ मिळेल. आर्थिक लाभ होईल. तब्येत जपा.