Numerology : आपल्या जन्मतारखेचा मूलांक 5 आहे तर नशीबवान आहात, होईल आर्थिक लाभ

what is the impact of radix 5 on human life, numerology if the radix of your birth date is 5 then you are lucky and earn a lot in business : जर आपली जन्मतारीख (Birth Date) ही कोणत्याही महिन्यातील 05, 14 किंवा 23 आहे तर मूलांक 5 असेल. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे.

numerology
आपल्या जन्मतारखेचा मूलांक 5 आहे तर नशीबवान आहात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आपल्या जन्मतारखेचा मूलांक 5 आहे तर नशीबवान आहात
  • मूलांक 5 असलेल्यांचा स्वभाव
  • मूलांक 5 असलेल्यांची वैशिष्ट्ये

what is the impact of radix 5 on human life, numerology if the radix of your birth date is 5 then you are lucky and earn a lot in business : जर आपली जन्मतारीख (Birth Date) ही कोणत्याही महिन्यातील 05, 14 किंवा 23 आहे तर मूलांक 5 असेल. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 5 मूलांक असलेले धाडसी आणि हुशार असतात. सतत नव्या योजनांवर काम करून जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांची ख्याती असते. चला तर मग, मूलांक 5 बाबत आणखी माहिती जाणून घेऊ...

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Happy Rose Day 2023 Wishes in Marathi: रोज डेच्या मराठीत शुभेच्छा Messages, WhatsApp Status, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन व्यक्त करा तुमचे प्रेम

मूलांक 5 असलेल्यांचा स्वभाव

मूलांक 5 असलेले व्यवहारचतुर, हुशार, साहसी असतात. यांचा सेंस ऑफ ह्युमर जबरदस्त असतो. एकदा हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसणे यांना जमतच नाही. भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व देण्याच्या सवयीमुळे जास्त वेळ दुःख करत बसणे यांना जमत नाही. सतत नवे आव्हान स्वीकारणे आणि ते आव्हान पूर्ण केल्यावर यश साजरे करणे यांना आवडते. 

मूलांक 5 असलेल्यांची वैशिष्ट्ये

मूलांक 5 असलेले समोरच्याच्या स्वभावाबाबत लवकर अचूक अंदाज करू शकतात. यामुळे माणसं ओळखण्यात हुशार असलेली व्यक्ती असे त्यांना म्हणतात. इतरांवर प्रभाव टाकणे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे यांना सहज जमते. पुस्तकी शिक्षणात इतरांच्या तुलनेत ही मंडळी मागे असू शकतात. पण व्यवहार चातुर्याच्या जोरावर हे आपल्या उणिवांमधून मार्ग काढू शकतात. एक पेक्षा जास्त भाषांवर उत्तम पकड हे पण मूलांक 5 असलेल्यांचे वैशिष्ट्य आहे. 

मूलांक 5 असलेल्यांची आर्थिक स्थिती

मूलांक 5 असलेल्यांची आर्थिक स्थिती अनेकदा चांगली असते. हुशारीने आर्थिक लाभ मिळविण्यात हे हुशार असतात. नवी कौशल्ये आत्मसात करणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, संवादाद्वारे माणसं जोडणे यामुळे ही मंडळी वेगाने प्रगती करतात. नोकरीपेक्षा व्यवसायात असलेले लवकर प्रगती करतात. 

मूलांक 5 असलेल्यांची लव्ह लाईफ

मूलांक 5 असलेल्यांच्या लव्ह लाईफमध्ये चढउतार येत असतात. या मूलांकाच्या काही जणांचे 2 वेळा लग्न झाल्याचे बघायला मिळते. पण अशी उदाहरणे मर्यादीत आहेत. मूलांक 5 असलेले त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आणि सुखी असल्याचे अनेकदा दिसते. 

मूलांक 5 असलेल्यांचे करिअर

मूलांक 5 असलेले व्यापार उद्योगात यशस्वी होतात. मॅनेजर, वकील, जज, पत्रकार, जनसंपर्क अधिकारी (पब्लिक रिलेशन ऑफिसर), शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर म्हणून मूलांक 5 असलेले अनेकदा यशस्वी होतात. मूलांक 5 असलेल्यांना अर्थशास्त्र, संगीत यांची उत्तम जाण असल्याचे अनेकदा दिसते.

मूलांक म्हणजे काय? भाग्यांक म्हणजे काय?

मूलांक म्हणजे फक्त जन्मतारखेच्या आकड्याची बेरीज आणि भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेची बेरीज. जर आपली जन्मतारीख ही कोणत्याही महिन्यातील 05, 14 किंवा 23 आहे तर मूलांक 5 असेल. आपली जन्मतारीख 14 फेब्रुवारी 2000 आहे तर 1 + 4 + 0 + 2 + 2 + 0 + 0 + 0 = 9. याचा अर्थ आपला भाग्यांक 9 असेल. मूलांक आणि भाग्यांक यांच्या मदतीने एखादी व्यक्तीचे भविष्य, करिअर, आर्थिक परिस्थिती या संदर्भात अंदाज करणे शक्य होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी