Numerology: अनेक संपत्तीचे मालक असतात या तारखेला जन्मलेले लोक, असतात हे गुण

भविष्यात काय
Updated May 05, 2022 | 12:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

अंक ज्योतिषानुसार ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९,१८ आणि २७ तारखेला झाला अल्यास त्याच्या जन्मतारखेनुसार त्यांचा मूलांक ९ असतो. 

numerology
Numerology:अनेक संपत्तीचे मालक असतात या तारखेला जन्मलेले लोक 
थोडं पण कामाचं
  • अंक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला भूमी, कृषी, भवन सारख्या क्षेत्रांचा संबंध असतो.
  • मंगळ असल्यामुळे ९ मूलांक असलेल्या व्यक्ती थोड्या स्वभावाने तिखट असतात.
  • अशा लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि बहादुरी असते.

मुंबई: आपल्या भविष्याबाबत(astrology) जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव, विशेष गुण यांबाबत माहिती मिळते. अंक ज्योतिषामध्ये(numerology) व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक काढला जातो. अंक ज्योतिषानुसार ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९,१८ आणि २७ तारखेला झाला अल्यास त्याच्या जन्मतारखेनुसार त्यांचा मूलांक ९ असतो. Numerology: know all about 9 moolank people

अधिक वाचा - झोपताना पाय पूर्वेकडे करू नये, जाणून घ्या कारणं

जन्मांक ९ चा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रह आत्मबल वाढवतो. राजकारणात प्रगतीची संधी मिळवून देतो. नेतृत्व गुण विकसित करतो. लोकप्रियता मिळवून देतो. आर्थिक सुबत्ता मिळवून देतो. जन्मांक ९ असलेली व्यक्ती संरक्षण क्षेत्रात, राजकारणात, व्यवस्थापन क्षेत्रात, एखाद्या ठिकाणी नेतृत्व करण्याची वेळ येते तेव्हा, आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरते.

अंकशास्त्रानुसार मूलांक ९चा स्वामी मंगळ आहे. मंगळ असल्यामुळे ९ मूलांक असलेल्या व्यक्ती थोड्या स्वभावाने तिखट असतात. अशा लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि बहादुरी असते. मूलांक ९च्या व्यक्ती अनेक जमिनींचे मालक असतात. अशा लोकांना आपली बाजू स्पष्टपणे मांडता येते. त्यांच्या या विशेष गुणांमुळेच हे लोक आपल्या आयुष्यात वेगाने पुढे जातात आणि कधीच मागे वळून पाहत नाहीत. 

अंक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला भूमी, कृषी, भवन सारख्या क्षेत्रांचा संबंध असतो. यासाठी या व्यक्तींकडे भू संपत्तीची कमतरता नसते. असे लोक कृषीच्या माध्यमातूनही खूप फायदा मिळवतात. या व्यक्ती स्वातंत्र प्रकृतीच्या असतात. कोणत्याही समस्येला घाबरत नाही तर डटून त्याचा सामनाकरतात. यांचा गुरू मंगळ असल्याने या व्यक्तींना लवकर राग येतो. 

अधिक वाचा - पुदीना दूर करतो हे गंभीर आजार, जाणून घ्या त्याचे मुख्य फायदे

दरम्यान, आरोग्याच्या दृष्टीने थोडे कमकुवत असतात. अशा लोकांना ताप, डोकेदुखी, दुखापत, रक्तविकार सारखे आजार होऊ शकतात तसेच या लोकांना आग अथवा केमिकलच्या दुर्घटनेमुळे त्रास होण्याचा संभव असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी सावधानतेने आपली कामे करावीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी