अंकराशी : ज्यांचा जन्म ३ जानेवारीला झाला आहे त्यांचं नशीब बदलेल!

भविष्यात काय
Updated Jan 03, 2022 | 05:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology Prediction 3 January 2022 : जर आपला जन्म ३, १२, २१, ३० यापैकी एखाद्या दिवशी झाला असेल तर आपला जन्मांक/भाग्यांक/मूलांक ३ आहे. जाणून घेऊ या पद्धतीने ३ जानेवारी २०२२ रोजी प्रत्येक मूलांकाचे काय आहे भविष्य...

Numerology Prediction 3 January 2022
अंकराशी : ज्यांचा जन्म ३ जानेवारीला झाला आहे त्यांचं नशीब बदलेल! 
थोडं पण कामाचं
 • अंकराशी : ज्यांचा जन्म ३ जानेवारीला झाला आहे त्यांचं नशीब बदलेल!
 • प्रत्येक मूलांकाचे काय आहे भविष्य...
 • कसा जाईल आजचा दिवस

Numerology Prediction 3 January 2022 : ज्योतीषशास्त्रात अंकशास्त्र हा पण एक प्रकार आहे. अंकावरुन पण व्यक्तीचा स्वभाव, गुणदोष, व्यक्तीमत्व, भविष्य याविषयी सांगता येते. जर आपला जन्म ३, १२, २१, ३० यापैकी एखाद्या दिवशी झाला असेल तर आपला जन्मांक/भाग्यांक/मूलांक ३ आहे. जाणून घेऊ या पद्धतीने ३ जानेवारी २०२२ रोजी प्रत्येक मूलांकाचे काय आहे भविष्य...

 1. मूलांक १ - प्रगती कराल. कतृत्वाच्या जोरावर इतरांवर प्रभाव पाडाला. तुमचे कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. कठीण काम पण ओळखीतल्यांच्या सहकार्याने सहज पार पाडाल. वाहन किंवा यंत्र हाताळताना स्वतःला जपा. बाहेरचे खाणेपिणे टाळा. पोटाचे विकार असल्यास वेळीच उपचार करुन घ्या.
 2. मूलांक २ - नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नशिबाची साथ मिळेल. नव्या कामाचा शुभारंभ कराल. रखडलेली कामं मार्गी लागतील. व्यवसायात फायद्याचे योग आहेत. दांपत्य जीवन आनंदी आहे. कौटुंबिक सुख लाभेल. तब्येत बरी राहील.
 3. मूलांक ३ - मिश्र दिवस. नशिबापेक्षा कृतीवर भर द्या. प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य आपले साथ देईल. हलगर्जीपणा आणि चुका टाळा. आर्थिक व्यवहारात सावध राहा. अनुभवींचा सल्ला घ्या. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. चिंता करणे कमी करा.
 4. मूलांक ४ - दिवसभरात चढउतार दिसून येतील. सावध राहा. आर्थिक व्यवहार जपून करा. कोणतीही कृती विचारपूर्वक करा. घाई टाळा. पैसे उसने देणे किंवा घेणे टाळा. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. चिंता करणे कमी करा.
 5. मूलांक ५ - नोकरी-व्यवसायात बरा दिवस आहे. सहकाऱ्यांची साथ लाभेल. शब्दांवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. डोकं शांत ठेवा. परिस्थितीचा अंदाज घेऊन विचारपूर्वक कृती करणे फायद्याचे ठरेल. तब्येत जपा.
 6. मूलांक ६ - दिवस छान आहे. नोकरी-व्यवसायासाठी दिवस अनुकूल आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने अडचणींतून मार्ग काढाल. प्रश्नांवर उत्तर शोधाल. प्रगतीची संधी शोधून ती साधू शकाल. मिष्टान्न योग आहे. तब्येत सांभाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
 7. मूलांक ७ - नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नव्या कार्याचा शुभारंभ करा. फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. दांपत्य जीवन उत्तम राहील. ओळखीतल्यांची साथ लाभेल. दिवस आनंदात जाईल.
 8. मूलांक ८ - नोकरी-व्यवसायात स्व-कतृत्वावर विश्वास ठेवा. नव्या योजना लांबणीवर टाका. मोठे निर्णय घेणे टाळा. प्रवास टाळा. नाईलाज असल्यास प्रवासात खबरदारी घ्या. तब्येत जपा. बाहेरचे खाणे टाळा. वाद टाळा आणि कायदा पाळा. वाहन जपून चालवा. 
 9. मूलांक ९ - सावध ऐका पुढल्या हाका. विचारपूर्वक कृती करा. हलगर्जीपणा आणि चुका टाळा. नियोजनामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकाल. वाईटातून चांगलं मिळवू शकाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी