Shukra Gochar 2022: ९ दिवसांमध्ये संपणार ३ राशीतील लोकांची प्रतिक्षा; मिळणार भरघोस पैसा

भविष्यात काय
Updated Jun 10, 2022 | 10:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shukra Gochar June 2022 Effect । १८ जून रोजी शुक्र ग्रहाचे वृषभ राशीमध्ये संक्रमण होत आहे. शुक्र आपल्याच वृषभ राशीत राहील आणि त्याच्यानंतर वृषभ राशीत प्रवेश करेल. लक्षणीय बाब म्हणजे या संक्रमणाच्या काळात शुक्र सर्व राशींच्या लोकांच्या संपत्ती, सुख आणि वैवाहिक जीवनावर परिणाम करेल.

On June 18, Venus is transiting to Taurus, these people will benefit
९ दिवसात संपणार ३ राशीतील लोकांची प्रतिक्षा, होणार मालामाल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १८ जून रोजी शुक्र ग्रहाचे वृषभ राशीमध्ये संक्रमण होत आहे.
  • शुक्र आपल्याच वृषभ राशीत राहील आणि त्याच्यानंतर वृषभ राशीत प्रवेश करेल.
  • वृषभ राशीतील शुक्र ग्रहाचे संक्रमण मेष राशीतील लोकांसाठी खूप लाभदायक असणार आहे.

Shukra Gochar June 2022 Effect । मुंबई : १८ जून रोजी शुक्र ग्रहाचे वृषभ राशीमध्ये संक्रमण होत आहे. शुक्र आपल्याच वृषभ राशीत राहील आणि त्याच्यानंतर वृषभ राशीत प्रवेश करेल. लक्षणीय बाब म्हणजे या संक्रमणाच्या काळात शुक्र सर्व राशींच्या लोकांच्या संपत्ती, सुख आणि वैवाहिक जीवनावर परिणाम करेल. तर राशीतील लोक या काळात खूप पैसा कमावणार आहेत. हा काळ या लोकांसाठी प्रगती आणि पैसा मिळवून देणारा असेल. चला तर म जाणून घेऊया शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या लोकांचे नशीब चमकणार आहे. (On June 18, Venus is transiting to Taurus, these people will benefit). 

अधिक वाचा : राज्यसभेला मतदान करताना खासदारांना का येतं टेन्शन?

शुक्राचे संक्रमण या राशीतील लोकांचे चमकवणार नशीब

  1. मेष राशी - वृषभ राशीतील शुक्र ग्रहाचे संक्रमण मेष राशीतील लोकांसाठी खूप लाभदायक असणार आहे. त्यांना करिअरच्या क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. खासकरून या काळात व्यापाऱ्यांचे सुगीचे दिवस असणार आहेत. नफ्यात झपाट्याने वाढ होईल. व्यापार वाढवण्यासाठी गुंतवणुक कराल. अडकलेले पैसे या काळात परत मिळतील. या राशीतील लोकांसाठी शुक्राचे संक्रमण वैवाहिक जीवनासाठी खूप शानदार असेल. जोडीदाराकडून प्रेम आणि मदतीची भरघोस साथ मिळेल. 
  2. कर्क राशी - कर्क राशीतील लोकांसाठी शुक्राचे संक्रमण खूप लाभदायक असणार आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्रात चांगला लाभ होईल. प्रमोशन तसेच पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असेल. नफ्यात विक्रमी वाढ होईल. एकूणच चांगला पैसा कावल्याने तुमच्या बचतीमध्ये वाढ होणार आहे. जीवनातील सुख-सुविधा वाढतील. कुटुंबातील महिलांकडून मदत आणि प्रेम मिळेल. 
  3. सिंह राशी - सिंह राशीतील लोकांसाठी हे संक्रमण त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळवून देईल. नोकरी करणाऱ्या वर्गातील लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. या काळात प्रमोशन होण्याची देखील दाट शक्यता आहे. एकूणच नशीबाची पूर्ण साथ असणार आहे आणि मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी देखील हा काळ चांगला आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. ज्येष्ठ आणि कुटुंबातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदत मिळेल. भागीदारी केल्यास कामाला आणखी गती येईल. 

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी