Weekly Numerological Horoscope: या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या मूलांकातील लोकांना मिळणार भरघोस पैसा

भविष्यात काय
Updated May 02, 2022 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerological Horoscope । जन्मतारखेवरून आपला मूलांक क्रमांक कोणता आहे हे पाहिले जाऊ शकते. मूलांक क्रमांक तपासण्यासाठी आपल्या जन्मतारखेची गणना करावी लागेल.

On the first day of this week, the people in this category will get a lot of money
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या मूलांकातील लोक होणार मालामाल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जन्मतारखेवरून आपला मूलांक क्रमांक कोणता आहे हे पाहिले जाऊ शकते.
  • मूलांक क्रमांक तपासण्यासाठी आपल्या जन्मतारखेची गणना करावी लागेल.
  • जन्मतारखेनुसार ज्या लोकांचा मूलांक क्रमांक २ आहे, तो त्याच्या घरच्या सदस्याच्या आरोग्याशी संबंधित अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळेल.

Numerological Horoscope । मुंबई : जन्मतारखेवरून आपला मूलांक क्रमांक कोणता आहे हे पाहिले जाऊ शकते. मूलांक क्रमांक तपासण्यासाठी आपल्या जन्मतारखेची गणना करावी लागेल. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख १६ एप्रिल १९९५ असेल तर त्याचा मूलांक क्रमांक १+६+४+१+९+९+५ = ३+५ =८ असेल. याच पद्धतीने तुमच्या जन्मतारखेची गणना केल्यास तुम्हाला तुमचा मूलांक क्रमांक मिळेल. (On the first day of this week, the people in this category will get a lot of money). 

अधिक वाचा : आज आणि उद्या या शहरात बंद राहणार बॅंका

मूलांक १ 

ज्या लोकांचा मूलांक क्रमांक १ आहे, त्यांना नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. दिवसाच्या सुरूवातीला अशी गोष्ट जाणून घेण्याची तुमच्यात इच्छा अधिक असते, ज्याचा परिणाम इतरांवर देखील दिसून येईल. तुम्ही तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यापासून वाचा अन्यथा अडचणीत वाढ होऊ शकते. 

मूलांक २

जन्मतारखेनुसार ज्या लोकांचा मूलांक क्रमांक २ आहे, तो त्याच्या घरच्या सदस्याच्या आरोग्याशी संबंधित अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळेल. दुपारनंतर परिस्थिती थोडी अनुकूल होऊ लागेल आणि कामाला गती येईल. 

मूलांक ३

जन्मतारखेनुसार आजच्या दिवशी ज्यांचा मूलांक ३ आहे, त्यांना कोणासोबतही काही अडचण होत असेल तर त्यातून मार्ग काढण्याची संधी असणार आहे. कोणत्याही व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि लाभदायक राहणार आहे.

मूलांक ४ 

दरम्यान, मूलांक क्रमांक ४ मधील लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. कारण ते आज मित्रांसोबत मस्तीच्या मूडमध्ये असतील. सासरच्या मंडळींकडून तुमच्या कामात गती राहील. आजचा दिवस प्रियजनांकडून काही खास गोष्टी मिळवण्याचा आहे. तुम्हाला काही वस्तू भेटवस्तू म्हणूनही मिळू शकतात.

मूलांक ५

जन्मतारखेनुसार आज ज्या लोकांचा मूलांक ५ आहे, त्यांना त्यांच्या कामात पैसे कमावण्याच्या अधिक चांगल्या संधी हव्या असतील, तर तुम्ही लोकांसोबत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तुम्हाला क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. 

मूलांक ६ 

जन्मतारखेनुसार आज ज्या लोकांचा मूलांक ६ आहे, त्यांना आज व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात. जोडीदाराच्या मनमानीमुळे तुम्हाला त्रास होत नसेल तरच तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येऊ शकतो. व्यवसायात भागीदारीतूनही लाभ होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील.

मूलांक ७ 

लक्षणीय बाब म्हणजे ज्या लोकांचा मूलांक हा ७ आहे, ती लोक आजच्या दिवशी एकाचवेळी अनेक कामात अग्रस्थानी असतील. तुमच्या वैवाहित जीवनात आनंद येऊ शकेल, फक्त जोडीदाराच्या मनमानीमुळे तुम्हाला त्रास होत नसेल तर. व्यवसायात भागीदारीतूनही लाभ होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील.

मूलांक ८ 

ज्या लोकांचा मूलांक क्रमांक ८ आहे ते त्यांच्या कामात पुढे असतील. संशोधन कार्यात गुंतलेल्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला जाणार आहे. तुम्हाला चांगल्या नोकऱ्या आणि नवीन संधी देखील मिळू शकतात. यावेळी तुमच्यासाठी दिवस खूप थकवणारा असू शकतो.

मूलांक ९

जन्मतारखेनुसार ज्या लोकांचा मूलांक ९ आहे त्यांनी आज त्यांच्या पालकांसोबत वेळ घालवला पाहिजे. कारण सध्या तुम्हाला त्यांच्या आशिर्वादाची आणि तुमच्या प्रियजनांसोबत राहण्याची गरज आहे. असे केल्यास तुम्ही कामात पुढे जाऊ शकता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी