Palmistry : जर तुमच्या हातावर असेल ही खून तर तुम्ही आहात भाग्यवान, श्रीमंत होण्याचा आहे योग

एखादी व्यक्ती श्रीमंत होणार की नाही यामागे त्याचे नशीबही महत्त्वाचे असते. तसेच त्याच्या हातांवरील रेषाही महत्त्वाच्या भूमिका निभावतात. या बाबतीत काही लोक फार नशीबवान असतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हातात काही चिन्ह आणि रेषा असतात त्यावरून ठरतं की आपण भविष्यात किती श्रीमंत होणार आहोत.

palmistry
रेषाशास्त्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एखादी व्यक्ती श्रीमंत होणार की नाही यामागे त्याचे नशीबही महत्त्वाचे असते.
  • तसेच त्याच्या हातांवरील रेषाही महत्त्वाच्या भूमिका निभावतात.
  • या बाबतीत काही लोक फार नशीबवान असतात.

Palmistry : मुंबई : एखादी व्यक्ती श्रीमंत होणार की नाही यामागे त्याचे नशीबही महत्त्वाचे असते. तसेच त्याच्या हातांवरील रेषाही महत्त्वाच्या भूमिका निभावतात. या बाबतीत काही लोक फार नशीबवान असतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हातात काही चिन्ह आणि रेषा असतात त्यावरून ठरतं की आपण भविष्यात किती श्रीमंत होणार आहोत. 


आयुष्यात प्रत्येकाला श्रीमंत आणि धनवान व्हायचं असतं. परंतु अथक परिश्रम करूनही अनेक जण आपल्याला हवी तेवढी संपत्ती मिळत नाही. एखादा माणूस श्रीमंत होणार की नाही हे त्याच्या हातावरील रेषांवरही ठरत असत. 

हातावर V खून

हस्तरेषा शास्त्रानुसार हृदय रेषेवरून आपल्याला आर्थिक स्थितीचा अंदाज काढता येतो. या रेषेवर असलेली इंग्रजी अद्याक्षर V ची खुण ही धन, संपत्ती असल्याचे प्रतीक आहे. ही खुण म्हणजे व्यक्तीच्या यशाचे संकेत मानले जाते. ज्या लोकांच्या हातावर ही खुण असते ते लोक आपल्या आयुष्यात खुप पैसे कमावतात असे सांगितले जाते. 

तीन रेषांची H

आपल्या हातावर हृदय, भाग्य आणि मस्तिष्क अशा तीन रेषा असतात. या तीन रेषांची बनून एक रेष बनते ती इंग्रजी अद्याक्षर Hसारखी दिसते. ज्यांच्या हातावर H असे खुण असते त्यांना वयाच्या ४० नंतर आयुष्यात खुप सकारात्मक बदल होता. परंतु चाळीशीपुर्वी यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. 

हस्तरेषेनुसार जर बोटांच्या खाली जर उभ्या रेषा असतील तर असे लोक फार श्रीमंत होऊ शकतात. या रेषा जितक्या स्पष्ट आणि खोलवर असतील तेवढेच ते जास्त श्रीमंत होती. हे लोक बँक बॅलेन्स सांभाळण्यात आणि पैसे जमा करण्यात हुशार असतात. 

जर तुमच्या हातावर अंगठ्यापासून एक रेष निघून मरंगळीपर्यंत (करंगळीच्या बाजुचे बोटफ एक रेष निघत असेल तर तुमच्या नशीबात राजयोग होण्याची शक्यता आहे. हे लोक फार इमानदार आणि श्रीमंत असतात. या लोकांना पैसे कमावण्यासाठी कुठल्याही प्रकारे शॉर्टकट असतात. या लोकांच्या आयुष्यात पैश्यांची कमी नसते. समाजात त्यांना खुप सन्मान मिळतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी