Numerology:'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूप श्रीमंत आणि सुंदर; पैसे खर्च करतानाही करत नाही कशाचा विचार

Numerology: व्यक्तीच्या आयुष्यात अंकाशास्त्राला ही देखील विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रावर ही व्यक्तीचं भविष्य ठरलेलं असतं.

Numerology
या जन्म तारखेचे लोक श्रीमंत आणि सुंदर असतात 
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अंकांना विशेष महत्त्व असते.
  • आयुष्यात काही अंक भाग्यवान ठरत असतात तर काही अशुभ.
  • अंकशास्त्रात 1 ते 9 हे अंक आढळून येतात.

मुंबई: प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अंकांना विशेष महत्त्व असते. आयुष्यात काही अंक भाग्यवान ठरत असतात तर काही अशुभ. अंकशास्त्रात 1 ते 9 हे अंक आढळून येतात. हे अंक एक किंवा दुसऱ्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात. व्यक्तीच्या आयुष्यात अंकाशास्त्राला ही देखील विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रावर ही व्यक्तीचं भविष्य ठरलेलं असतं. 

आज आपण 6 मूल्यांक बद्दल बोलणार आहोत. या अंकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूल्यांक आकडा हा 6 असतो. हे लोक दिसायला खूप सुंदर असतात. तसंच शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यानं हे लोक धनवान असतात आणि मनसोक्त खर्च करतात.

अधिक वाचा- Nagpur Rape Case: धक्कादायक! नोकरीचं आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार

सुंदर आणि श्रीमंत असतात ही लोकं 

मूल्यांक 6 चा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्र ग्रह विलास, उपभोग, सौंदर्य, संपत्ती आणि वैभवाचा कारक मानला जातो. म्हणूनच या मूल्यांकाखाली जन्मलेले लोक सुंदर आणि श्रीमंत असतात. हे लोक पैसे खर्च करण्यासाठी नेहमी पुढे असतात. ते पैसे खर्च करताना कशाचाच विचार करत नाही. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात. तसंच सुंदर सौंदर्य असल्यानं हे लोकं लवकर आकर्षित होतात. या मूल्यांकाची लोकं त्यांच्या पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीला किंवा कोणालाही वेड लावू शकतात. त्यांना प्रवासाचीही आवड असते.  हे लोक निसर्गप्रेमी ही असतात.

पैसे कमवण्याची असते तीव्र इच्छा 

या लोकांना सर्व भौतिक सुख प्राप्त करायचं असतं, असं अंकशास्त्रानुसार सांगण्यात येतं. 6 मूल्यांक असलेले लोकं लहानपणापासूनच त्यांच्या करिअरबाबतचा विचार करत असतात. तसंच यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करतात. पैसे कमावण्यासाठी याची नेहमी तीव्र इच्छा या लोकांमध्ये असते. अशा लोकांचा स्वभाव देखील मजेदार आणि मजेशीर असतो. त्याच्या अशा स्वभावामुळे त्यांच्याशी जोडले जाऊ इच्छितात. या लोकांना कोणत्याही जबरदस्ती आणि बळजबरीने नाही तर प्रेमानं आपल्याकडे ओढलं जाऊ शकतं. 

अधिक वाचा- डोंबिवलीत लिफ्टच्या खड्ड्यात पडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

या क्षेत्रात मिळतं यश 

या लोकांना फिल्म लाइन, मीडिया, नाटक, अन्न, कपडे आणि दागिने यांच्याशी संबंधित कामात यश मिळतं. हे लोक मूल्यांक 6, 15 आणि 24 च्या लोकांशी चांगले मित्र बनतात. अंकशास्त्रानुसार, हलका निळा, हलका गुलाबी आणि सफेद रंग या मूल्यांकांच्या लोकांसाठी सर्वात शुभ मानला जातो. हा रंगांचे रुमाल तुम्ही नेहमी हातात ठेवू शकता. जे तुमच्यासाठी लकी चार्म ठरेल. कारण हा रंग तुमच्या राशीचा स्वामी शुक्र ग्रहाचा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी