Numerology: या तारखेला जन्मलेली लोक खूप लकी असतात, संपत्ती आणि प्रतिष्ठेची कधीच कमतरता भासत नाही

भविष्यात काय
Updated Apr 30, 2022 | 10:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology । अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक ६ मध्ये जन्मलेली लोक खूप आनंदी आणि भाग्यवान असतात. ज्या लोकांचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखांना झाला असतो त्यांचा मूलांक क्रमांक हा ६ असतो. दरम्यान मूलांक ६ मधील लोक खूप भाग्यवान, आनंदी आणि लकी असतात. त्यांना भाग्याचे धनी मानले जाते.

People at radix 6 are very lucky, never lacking in wealth and prestige
या तारखेला जन्मलेली लोक खूप लकी असतात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक ६ मध्ये जन्मलेली लोक खूप आनंदी आणि भाग्यवान असतात.
  • ज्या लोकांचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखांना झाला असतो त्यांचा मूलांक क्रमांक हा ६ असतो.
  • अंकशास्त्रानुसार 6 हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.

Numerology । मुंबई : अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक ६ मध्ये जन्मलेली लोक खूप आनंदी आणि भाग्यवान असतात. ज्या लोकांचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखांना झाला असतो त्यांचा मूलांक क्रमांक हा ६ असतो. दरम्यान मूलांक ६ मधील लोक खूप भाग्यवान, आनंदी आणि लकी असतात. त्यांना भाग्याचे धनी मानले जाते. अंकशास्त्रानुसार 6 हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे अशा लोकांना जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. हे लोक खूप मेहनती असतात. हे लोक जे काही काम करतात त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळते. (People at radix 6 are very lucky, never lacking in wealth and prestige).  

अधिक वाचा : डायबिटीजच्या रूग्णांसाठी शुगर वाढणे ठरू शकते धोकादायक

यांच्यावर असते माता लक्ष्मीची विशेष कृपा 

असे म्हणतात की या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहते. त्यांना कधीही पैसा आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांच्याकडे नेहमीच पैसे असतात. ते अतिशय आनंदी स्वभावाचे आहेत.

खूप आकर्षित असते त्यांचे व्यक्तिमत्व

मूलांक क्रमांक ६ मधील लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षित करणारे असते. लोक यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. लक्षणीय बाब म्हणजे ही लोक आपल्या सुख-सुविधांवर खूप पैसे खर्च करतात. त्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली असते. ते जीवनात खूप पैसे कमावतात आणि खर्च देखील मोठ्या प्रमाणात करतात. त्यांच्याकडे जमीन आणि वडिलोपार्जित मालमत्तेची कमतरता नसते. 

लव्ह लाईफ 

या मूलांकातील लोकांची लव्ह लाईफ तितकीशी चांगली नसते. कारण हे लोक कोणाच्या तरी चर्चेत आल्यानंतर लवकरच रिलेशनशिपमध्ये येतात. पण घाईघाईने घेतलेला निर्णय चांगला नाही.

चांगले मित्र असतात

हे लोक चांगले मित्र असल्याचे सिद्ध करतात. त्यांना संगीतात प्रचंड रस आहे. ते खूप सक्रिय आहेत. ते जे काम हाती घेतात ते पूर्ण करूनच राहतात. मूलांक ६ मधील लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी असतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी