Numerology: या तारखांना जन्मलेल्या लोकांना या आठवड्यात मिळेल आनंदाची बातमी

भविष्यात काय
Updated Mar 30, 2022 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology | ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल माहिती सांगते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक संख्येनुसार राशी असते. अंकशास्त्रानुसार तुमची संख्या काढण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष एकक अंकापर्यंत जोडा आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा भाग्यांक असेल

People born on this date will have good news this week
या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी हा आठवडा असणार खास   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल माहिती सांगते.
  • महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक हा २ असतो.
  • मूलांक ४ मधील लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे.

Astrology | मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र देखील व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल माहिती सांगते. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक संख्येनुसार राशी असते. अंकशास्त्रानुसार तुमची संख्या काढण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष एकक अंकापर्यंत जोडा आणि त्यानंतर जो क्रमांक येईल तो तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक हा २ असेल. (People born on this date will have good news this week). 

अधिक वाचा : सामन्यात झाली या सुंदर महिलेची एंट्री जिंकली चाहत्यांची मने

मूलांक १ 

* तुमचा मान-सन्मान वाढेल. 
* आरोग्य चांगले राहील.
* उद्योग व्यवसायात नवीन दिशेला लक्ष केंद्रित कराल.
* व्यवसायासाठी हा आठवडा चांगला आहे.
* एखाद्या जुन्या मित्राची गाठभेट होऊ शकते. 
* कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील, अडकलेले पैसे मिळतील.

अधिक वाचा : महाराष्ट्रात काॅंग्रेसचे २५ आमदार बंडखोरीच्या तयारीत

मूलांक ४

* तुमच्यासाठी हा आठवडा खूप शुभ आहे.
* व्यवसायातील तुमची आर्थिक संकटे दूर होतील. 
* कोणतीही चांगली बातमी मिळू शकते.
* कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो.
* मान-सन्मान वाढेल, अधिकार वर्गात प्रसन्न वातावरण राहील.

मूलांक ७ 

* या आठवड्यात तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. 
* मोठा लाभ मिळेल. 
* व्यवहाराच्या बाबतीतले प्रश्न मिटवा.
* कलेची आवड वाढेल. 
* व्यवसायासाठी वेळ चांगला आहे.
* तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे.
* तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी