Numerology: या दिवशी जन्मलेले लोक श्रीमंत असूनही याबाबत राहतात गरीब

भविष्यात काय
Updated May 18, 2022 | 10:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology For 5 Number | ज्योतिषशास्त्राच्या मदतीने तुम्ही विविध माध्यमातून तुमच्या भविष्यातील गोष्टींची माहिती मिळवू शकता. तसेच जन्म कुंडलीसोबतच तुम्ही अंकज्योतिषाच्या मदतीने देखील व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या संबंधित माहिती मिळवू शकता.

People born on this day, despite being rich, remain poor in this regard
या दिवशी जन्मलेले लोक श्रीमंत असूनही याबाबत राहतात गरीब  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्राच्या मदतीने भविष्यातील गोष्टींची माहिती मिळवली जाऊ शकते.
  • कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ आहे.
  • अंकज्योतिषशास्त्रानुसार मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे.

Numerology For 5 Number | मुंबई : ज्योतिषशास्त्राच्या मदतीने तुम्ही विविध माध्यमातून तुमच्या भविष्यातील गोष्टींची माहिती मिळवू शकता. तसेच जन्म कुंडलीसोबतच तुम्ही अंकज्योतिषाच्या मदतीने देखील व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या संबंधित माहिती मिळवू शकता. दरम्यान आज आपण कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या स्वभाव, जीवनमान आणि करिअरशी संबंधित अनेक महत्त्वाच्या माहितीबाबत भाष्य करणार आहोत. अंकशास्त्रानुसार या लोकांचा मूलांक क्रमांक हा ५ आहे. (People born on this day, despite being rich, remain poor in this regard). 

अधिक वाचा : पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित

धाडसी निर्णय घेतात

दरम्यान, अंकज्योतिषशास्त्रानुसार मूलांक ५ चा स्वामी ग्रह बुध आहे, जो ज्ञान आणि बुद्धीचा प्रतिक आहे. मूलांक ५ मधील लोक बुद्धीवान असणे स्वाभाविक आहे याशिवाय या मूलांकातील लोक धाडसी असतात. ही लोक संकटांचा आव्हानांच्या स्वरूपात स्वीकार करतात आणि त्यांच्याशी सामना करून विजय देखील मिळवतात. अशी लोक व्यवसायात धाडसी निर्णय घ्यायला घाबरत नाहीत. यांच्या आर्थिक स्थितीबद्दल भाष्य करायचे झाले तर त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते नवीन शोधांमधून नफा कमावतात. या मूलांकाच्या लोकांचे त्यांच्या भावंडांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी चांगले नाते असते.

रोगराईने घेरले आहे

याशिवाय जर आपण त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल भाष्य केले तर त्यांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत. दरम्यान ही लोक दुसऱ्यांकडे सर्वाधित आकर्षित होतात. मात्र त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे अधिक मित्र असतात. त्यांच्या कार्यक्षेत्राबाबत बोलायचे झाले तर मूलांक ५ मधील लोकांना व्यापार-उद्योगात यश मिळते. हे चांगले मॅनेजर, वकील, न्यायाधीश, लेखाधिकारी, जनसंपर्क अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, पत्रकार किंवा ज्योतिषी असू शकतात. त्यांच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर या मूलांकाचे लोक आपल्या तीक्ष्ण मेंदूचा जास्त वापर करतात. त्यामुळे बहुतांश लोकांना रोगराईने घेरले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी