Numerology । मुंबई : अंकज्योतिषशास्त्रामध्ये देखील व्यक्तीबद्दल माहिती दिली आहे. संख्यांच्या आधारे या ज्ञानावरून माणसाचा स्वभाव ओळखता येते. अंकशास्त्रानुसार ज्या लोकांची जन्मतारीख ५, १४, २३ आहे, त्यांचा मूलांक क्रमांक हा ५ आहे. (People in radix 5 get a decent job at a young age). अंकशास्त्रानुसार या मूलांकावर बुध ग्रहाचा प्रभाव पाहायला मिळतो. या मूलांकातील लोक खूप बुद्धीवान आणि ज्ञानी असतात. ते धैर्यवान आणि मेहनती देखील आहेत. ते जे काम करायचे ठरवतात ते काम पूर्ण करूनच शांत बसतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक कठीण आव्हानांचा ते सामना करतात.
अधिक वाचा : राज्यमंत्री बच्चू कडूंनी गायब केला थेट 1 कोटी रुपयांचा रस्ता
अंकज्योतिषशास्त्रानुसार मूलांक क्रमांक ५ मधील लोक करिअरमध्ये खूप नाव कमावतात. लहान वयातच ते आपली प्रतिभा सिद्ध करतात. मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर ते खूप उच्च स्थान मिळवतात. समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी होत आहेत. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. त्यांना नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त रस आहे. त्यांच्याकडे इतरांकडून काम करून घेण्याची कला आहे. परिस्थितीनुसार ते स्वतःमध्ये बदल करत असतात.
मूलांक क्रमांक ५ मधील लोक नेहमी काहीतरी नवीन करण्यासाठी तयार असतात. अनेक वेळा ही लोक एकाच नोकरीला अथवा व्यवसायाला कंटाळले असतात. त्यामुळेच ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. लक्षणीय बाब म्हणजे पैसा कमावण्याची योजना बनवण्यात हे खूप माहिर असतात. ही लोक आपल्या बोलण्याने समोरच्याला लगेच प्रभावित करू शकतात. त्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी चांगली असते कारण पैशांची बचत करण्याच हे खूप हुशार असतात. त्यामुळेच त्यांच्याकडे कधी पैशांची कमतरता नसते. ते अनेक मार्गांनी पैसे कमावत असतात.
मूलांक क्रमांक ५ मधील लोकांच्या लव्ह लाईफ बाबत भाष्य करायचे झाले तर लग्नापूर्वी त्यांचे प्रेमसंबंध एवढे चांगले नसतात. त्यांचे आपल्या जोडीदाराशी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होत राहतात. मात्र त्यांचे लग्नानंतरचे जीवन अधिक सुखकर असते. ते एक सुखी वैवाहिक जीवन जगत असतात.