Numerology: या तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळते मोठे पद, पैसाही कमवतात भरमसाठ

भविष्यात काय
Updated May 25, 2022 | 11:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Numerology Number 1 । ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचाही संबंध माणसाच्या जीवनाशी असतो, अंकशास्त्र देखील व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाची माहिती सांगत असते.

People in radix number 1 gets a big position in life
या तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात मिळते मोठे पद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचाही संबंध माणसाच्या जीवनाशी असतो.
  • ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक हा १ असेल.
  • मूलांक १ असलेले लोक खूप मैत्रीपूर्ण आणि मनमिळाऊ स्वभावाचे असतात.

Numerology Number 1 । मुंबई : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचाही संबंध माणसाच्या जीवनाशी असतो, अंकशास्त्र देखील व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाची माहिती सांगत असते. अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीचा मूलांक क्रमांक ठरवला जातो. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक क्रमांक हा १ असेल. (People in radix number 1 gets a big position in life). 

अधिक वाचा : मुंबईत एका स्कूटरवरून एकाचवेळी ६ जणांचा बेकायदा प्रवास

दरम्यान, मूलांक क्रमांकाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेला जोडावे लागेल. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख १९ असेल, तर त्याचा मूलांक १+९= १० = १+० = १ असेल. अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक क्रमांक १ असतो अशा लोकांना खूप प्रभावशाली आणि प्रतिष्ठित मानले जाते. चला तर म जाणून घेऊया मूलांक क्रमांक १ मधील लोकांची वैशिष्ट्ये. 

अधिक वाचा : मारा दांडी किंवा घ्या सुट्टी पण जरूर फिरा ही १० पर्यटन स्थळे

मनमिळाऊ स्वभावाचे असतात

अंकशास्त्रानुसार, मूलांक १ असलेले लोक खूप मैत्रीपूर्ण आणि मनमिळाऊ स्वभावाचे असतात. एवढेच नाही तर त्यांची लोकांशी लवकरच जवळीक निर्माण होते. असे लोक आपल्या गोड बोलण्याने आणि साध्या वागण्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात आपली चांगली जागा करत असतात. 

या मूलांकातील लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे, त्यामुळे ते समोरच्या व्यक्तीवर त्यांच्या वागण्याने आणि बोलण्याने प्रभाव पाडतात. शिवाय ही लोक ईमानदार असतात. ते निडर, धैर्यवान आणि स्वाभिमानी आहेत, ते जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरत नाहीत.

भाषण कौशल्य उत्तम

या मूलांकातील लोक चांगले व्यावसायिक असल्याचे सिद्ध करतात. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, भाषणाची क्षमता आणि वेळेची बांधिलकी यामुळे हे लोक चांगले उद्योगपती म्हणून सिद्ध होतात. याशिवाय ही लोक त्यांच्या कोणत्याही कामाला पूर्ण करूनच मोकळा श्वास घेतात. या मूलांकातील लोकांना त्यांची सर्व कामे व्यवस्थितपणे करण्याची सवय असते. 

त्यांच्या वेळ व्यवस्थापन कौशल्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्व गुणवत्तेमुळे हे लोक राजकारणाच्या क्षेत्रात मोठ्या पदांपर्यंत झेप घेतात. दरम्यान जर आपण त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल भाष्य केले तर सर्वसाधारणपणे त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांच्याकडे पैशांची कमतरता भासत नाही. मूलांक १ मधील लोकांसाठी शुभ दिन रविवार आणि सोमवार आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी या लोकांसाठी हे दिवस खूप लाभदायक असतात. पिवळा रंग देखील मूलांक १ मधील लोकांसाठी शुभ मानला जातो. 


डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरूअसलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी