जन्मापासून नशीबवान असतात 'या' अक्षरांपासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती

people named with this alphabets are lucky from birth : जाणून घेऊ की कोणत्या अक्षरापासून नावाची सुरुवात होत असेल तर त्या व्यक्ती जन्मापासून नशीबवान असतात.

people named with this alphabets are lucky from birth
जन्मापासून नशीबवान असतात 'या' अक्षरांपासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जन्मापासून नशीबवान असतात 'या' अक्षरांपासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती
  • ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी किमान एक-दोन अक्षरे तरी असतात ज्या आधारे त्या व्यक्तीचे नाव ठेवणे योग्य ठरू शकते
  • योग्य अक्षरावरून नाव ठेवल्यास भाग्योदय होण्यास मदत होते

people named with this alphabets are lucky from birth : ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान यांच्या आधारे त्याची कुंडली तयार करता येते. ही जन्मकुंडली त्या व्यक्तीची रास, त्याच्या नावाचे पहिले अक्षर, त्या व्यक्तीचे भविष्य, संबंधित व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व या बाबत मार्गदर्शन करू शकते. या मार्गदर्शनावरून संबंधित व्यक्तीची आयुष्यातील वाटचाल कशी असू शकेल याचा अंदाज येतो. जर संबंधित व्यक्तीच कुंडलीआधारे भविष्य, स्वभाव, व्यक्तिमत्व याबाबतची माहिती जाणून घेत असेल तर या माहितीद्वारे संबंधित व्यक्तीला स्वतःमध्ये सुधारणा करणे तसेच चुका टाळण्यासाठी खबरदारी घेणे ही काळजी घेण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी किमान एक-दोन अक्षरे तरी असतात ज्या आधारे त्या व्यक्तीचे नाव ठेवणे योग्य ठरू शकते. यापैकीच एखाद्या अक्षराआधारे नाव ठेवले तर भाग्योदय होण्यास मदत होते. पण काही माणसं अशी असतात ज्यांच्या नावाची सुरुवात विशिष्ट अक्षराने होते आणि ही माणसं जन्मापासूनच नशीबवान असतात. जाणून घेऊ की कोणत्या अक्षरापासून नावाची सुरुवात होत असेल तर त्या व्यक्ती जन्मापासून नशीबवान असतात. 

  1. D या इंग्रजी अक्षरावरून नावाची सुरुवात असलेले : बुद्धिमान. देवी सरस्वतीची कृपा असलेली माणसं. कायम आनंदी असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्यावर यांचा भर.
  2. G या इंग्रजी अक्षरावरून नावाची सुरुवात असलेले : इतरांपेक्षा वेगळे व्यक्तिमत्व. साधा आणि शांत स्वभाव. इतरांची मनं जिंकण्याची हातोटी. उत्तम दर्जाचे काम व्हावे यासाठी प्रचंड मेहनत घेतात. यशस्वी होईपर्यंत अविश्रांत मेहनत करणे यांना आवडते.
  3. K या इंग्रजी अक्षरावरून नावाची सुरुवात असलेले : प्रामाणिक, प्रेमळ, निष्ठावान, मनमिळाऊ स्वभावाची माणसं. सहज मित्र जोडणे यांना जमते.
  4. S या इंग्रजी अक्षरावरून नावाची सुरुवात असलेले : करिअरमध्ये उत्तम प्रगती करतात. आनंदात जगणे, मजामस्ती करणे, स्वतःसाठी थोडे पैसे खर्च करणे यांना आवडते. छंद जोपासणे आवडते. जीवनात संघर्ष असला तरी महत्त्वाची स्वप्न पूर्ण करणे यांना जमते. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही. अधिक तपशिलांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी