Astrology : या ४ राशींच्या आयुष्यात येत नाही संकट; बजरंगबली आणि शनिदेव करतात त्यांचे रक्षण

भविष्यात काय
Updated Jan 13, 2022 | 11:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology Future | ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचा समावेश आहे. प्रत्येक राशीचे स्वामी ग्रह असतात, ज्याचा त्या राशीवर पूर्णपणे प्रभाव असतो. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींवर हनुमानजी आणि शनिदेवाची विशेष कृपा असते. ज्या व्यक्तीला हनुमानजी आणि शनिदेवाचा विशेष आशिर्वाद मिळतो, त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही.

People of Aries Leo Scorpio and Aquarius never get trouble because they have the grace of Saturn
या ४ राशींच्या आयुष्यात येत नाही संकट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मेष, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांवर कधी संकट येत नाही कारण त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमानजी आणि शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांपासून संकटे दूर राहतात.
  • कुंभ राशीच्या लोकांकडे पैशाची कमतरता नसते. बजरंगबली कुंभ राशीच्या लोकांचे संकट क्षणात दूर करतात. या राशीचे लोक करिअरमध्ये देखील मोठी उंची गाठतात.

Astrology Future | नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचा समावेश आहे. प्रत्येक राशीचे स्वामी ग्रह असतात, ज्याचा त्या राशीवर पूर्णपणे प्रभाव असतो. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींवर हनुमानजी आणि शनिदेवाची विशेष कृपा असते. ज्या व्यक्तीला हनुमानजी आणि शनिदेवाचा विशेष आशिर्वाद मिळतो, त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही. त्यामुळे कोणत्या राशींवर बजरंगबली आणि शनिदेव यांची विशेष कृपा असते याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता असते. मेष, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांवर कधीही संकट येत नाही कारण त्यांच्यावर शनिदेव हनुामनजींची विशेष कृपा असते (People of Aries Leo Scorpio and Aquarius never get trouble because they have the grace of Saturn).  

मेष राशी (Aries)   

ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या व्यक्तींवर हुनमानजी आणि शनिदेव यांची विशेष कृपा असते. मेष राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते. मेष राशीच्या लोकांनी हनुमानजींचा विशेष आशिर्वाद मिळवण्यासाठी दररोज भगवान श्री राम नामाचा जप करावा. हनुमानजींच्या कृपेने मेष राशीच्या लोकांची आर्थिक बाजूही मजबूत होते. दरम्यान या राशीच्या लोकांमध्ये इच्छाशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील जास्त असते. ते बुध्दीवान आणि हुशार असतात. 

सिंह राशी (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमानजी आणि शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांपासून संकटे दूर राहतात. या राशीच्या लोकांची आर्थिक बाजूही भक्कम आणि मजबूत असते. त्यांची हनुमानजींच्या कृपेने नोकरी-व्यवसायात प्रगती होते. सिंह राशीच्या लोकांनी हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज बजरंग बाणचे वाचन करावे. सिंह राशीचे लोक नोकरी आणि व्यवसायात नेहमी प्रगती करतात. 

Read Also : निवडणुकांमुळे शेतकऱ्यांची ही सुविधा रद्द

वृश्चिक राशी (Scorpio) 

वृश्चिक राशीच्या लोकांवर हनुमानजी आणि शनिदेव यांचा आशिर्वाद असतो. या राशीच्या लोकांच्या कामात कोणताही अडथळा येत नाही. हनुमानजींच्या कृपेने नोकरीत प्राधान्य मिळते. वृश्चिक राशीचे लोक हनुमानजींच्या कृपेने खूप भाग्यवान असतात. हनुमानजींच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या कामातील अडथळे कमी होतात. बजरंगबलीच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना यश मिळते. त्यांच्याकडे पैशाची समस्या कमी प्रमाणात असते. 

कुंभ राशी (Aquarius)   

ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार हनुमानजींच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामात लवकर यश मिळू शकते. कुंभ राशीवर हनुमानजींची विशेष कृपा राहते. कुंभ राशीच्या लोकांकडे पैशाची कमतरता नसते. बजरंगबली कुंभ राशीच्या लोकांचे संकट क्षणात दूर करतात. या राशीचे लोक करिअरमध्ये देखील मोठी उंची गाठतात. त्यांना पैसे कमावण्याच्या संधी मिळत राहतात. त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी