मोठं- मोठ्या संकाटात शांत राहतात या राशींचे लोक, अडचणीत करतात असा विचार

सर्व राशींचा स्वामी हा वेग-वेगळा अससल्याने त्यांचे वर्तन वेगळे असते. इतके वेगळे की, जर एकच दुख सर्व राशींना दिलं तरी त्या एकसमान त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. काही राशी ह्या एखाद्या परिस्थीत खूप चिंतित होत असतात, तर दुसरीकडे अशा काही राशी आहेत, ज्या संकटसमयी सुद्धा शांत आणि हसतमुख असतात.

People of this zodiac sign keep calm in big crisis and think like this
मोठं- मोठ्या संकाटात शांत राहतात या राशींचे लोक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सर्व राशी एकमेंकांपेक्षा वेगळे आहेत. सर्व राशींचा स्वामी हा वेग-वेगळा अससल्याने त्यांचे वर्तन वेगळे असते.
  • कर्क या राशीचे व्यक्ती संकटाच्यावेळी आपली हिंमत गमावून बसतात.
  • सिंह राशीचे व्यक्ती कठीण वेळी घाबरुन जात असतात.

नवी दिल्ली  :   राशीचक्रातील (Zodiac) सर्व 12 राशींचा एकमेंकाशी स्वभाव एकसारखा नाहीये. सर्व राशी एकमेंकांपेक्षा वेगळे आहेत. सर्व राशींचा स्वामी हा वेग-वेगळा अससल्याने त्यांचे वर्तन वेगळे असते. इतके वेगळे की, जर एकच दुख सर्व राशींना दिलं तरी त्या एकसमान त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. काही राशी ह्या एखाद्या परिस्थीत खूप चिंतित होत असतात, तर दुसरीकडे अशा काही राशी आहेत, ज्या संकटसमयी सुद्धा शांत आणि हसतमुख असतात. आपण अशाच काही राशींविषयी जाणून घेणार आहोत, ज्या संकटसमयी सुद्धा शांत राहत असतात. (People of this zodiac sign keep calm in big crisis and think like this) 

अधिक वाचा  : लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा हे तुळशीचे उपाय

मेष

या राशीचे लोकांना संकट नको असते. आयुष्यात संकट आले की, खूप चिंतेत जात असतात. कुटुंब आणि परिचयातील लोकांची चिंता त्यांना खूप असते. 

वृषभ

ह्या राशीचे लोक हे स्वताला जबाबदार समजणारे असतात. म्हणजेच जर कोणते संकट आले किंवा काही घटना घडली तर या राशीतील लोक त्यागोष्टीसाठी स्वता:ला जबाबदार समजत असतात. 

अधिक वाचा  : शरद पोंक्षेंची अंदमानातून राहुल गांधींवर टीका

मिथुन

कठीण वेळ आल्यास या राशीतील व्यक्ती चिंता करणं सुरू करत असतात. त्या परिस्थितीला हाताळण्यास ते खूप असमर्थ असल्याचं ते मानत असतात. 

कर्क

 या राशीचे व्यक्ती संकटाच्यावेळी आपली हिंमत गमावून बसतात. त्यांना वाटत असते की, आता सर्व संपलं आहे. सर्व नुकसान होईल असं ते मानत असतात. 

सिंह

या राशीचे व्यक्ती कठीण वेळी घाबरुन जात असतात. संकटसमयी ते इतके घाबरत असतात की, ते स्वता:ला संभाळू शकत नाहीत.

अधिक वाचा  : महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'

कन्या

या राशीचे लोक हे संकटावेळी  गोंधळत असतात. त्यांना वाटत असते की परिस्थिती ही सर्व बिघडली आहे आणि आपल्या हातात नुकसानाशिवाय काही राहिलेलं नाही. तसेच ही परिस्थितीत स्वता: ला संभाळणं सु्द्धा अवघड वाटत असतं. 

तुळ

या राशीचे लोक संकटसमयी स्वता:ला शांत ठेवत असतात आणि कोणताही निर्णय ते शांतपणे आणि विचारपूर्वक घेत असतात. 

अधिक वाचा  : दोन कारचा भीषण अपघातच 4 जणांचा मृत्यू,Watch Video

वृश्चिक

 या राशीचे लोक हे धडाकेबाज असतात. संकट आले तरी ते घाबरत नाहीत. परिस्थिती अजूनही बदलू शकते हा त्यांना विश्वास असतो. 

धनू

या राशीचे लोक खूप शांत स्वभावाचे असतात. आपल्या भावना कशाप्रकारे लपवून ठेवाव्यात हे त्यांना माहिती असते. मनातून ते दुखी असेल तरी बाहेरच्या जगाला आपण किती आनंदी आहोत, हे दाखवत असतात. 

मकर

 या राशीचे लोक हे आलेली परिस्थिती स्विकारत असतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचे पू्र्ण लक्ष हे सुधारणा करण्यावर असते. 

कुंभ

 या राशीचे व्यक्ती संकट किंवा अडचणीच्या काळात फार वेगळं वागत असतात. संकट आल्यानंतर हे व्यक्ती नवीन काही गोष्टींचा विचार करणं बंद करत असतात.  योग्यवेळी ते परिस्थितीत सुधारणा करणे आणि ती परिस्थिती कशी हाताळावी याचा प्रयत्न करत असतात. 

मीन

या राशीतील व्यक्ती हे संकटाच्यावेळी घाबरुन जात असतात. ते त्या गोष्टी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच ते हा प्रयत्न करतात की, पूर्ण समस्या कशाप्रकारे मिटवता येईल यावर विचार करत असतात. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी