People with mole on their hand are lucky : प्रत्येक माणसाच्या शरीरावर तीळ असतो. पण शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे यावरून माणसाचे नशीब निश्चित होते. ज्या माणसांच्या हातावर तीळ असतो ते नशिबवान असतात असे ज्योतीषशास्त्र सांगते. हाताच्या कोणत्या भागावर तीळ असेल तर नशिबावर काय परिणाम होऊ शकतो हे पण ज्योतीषशास्त्र सांगते. हातावर विशिष्ट ठिकाणी असलेला तीळ लाभदायी असतो तर विशिष्ट ठिकाणी असलेला तीळ त्रासदायक ठरू शकतो. जाणून घ्या हाताच्या कोणत्या भागावर तीळ असल्यास नशिबावर काय परिणाम होऊ शकतो...
मधल्या बोटावर तीळ असलेले नशिबवान असतात. लहान वयातच श्रीमंत होतात. सुख आणि संपत्ती यांना लाभते. पण मधल्या बोटावर खालच्या भागात शनि पर्वतावर तीळ असेल तर ते अशुभ असते. अशा मंडळींना आयुष्यात वारंवार संघर्ष करावा लागतो. अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. यशासाठी इतरांपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात.
अनामिकेवर तीळ असेल तर नोकरीत लाभ मिळतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढते. आयुष्यात आर्थिक अडचणी जाणवत नाहीत आणि जाणवल्या तर झटपट दूर होतात.
अनामिकेच्या खालील भागावर तीळ असेल तर नोकरी मिळवताना आणि टिकविताना अनेक अडचणी येतात. सामाजिक प्रतिमा वाईट होण्याची शक्यता जास्त असते.
हाताच्या चंद्र पर्वतावर तीळ असेल तर आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. कायम अस्थिरतेचा सामना करावा लागतो. यामुळे आपण सदैव अस्वस्थ असता. प्रेमात अपयश येण्याचा आणि लग्न अयशस्वी होण्याचा धोका असतो. काहींना लग्नासाठी प्रदीर्घ काळ वाट बघावी लागते.
छोट्या बोटावर तीळ असेल तर संबंधित व्यक्ती नशिबवान असते. या व्यक्तीला आर्थिक अडचणी येत नाहीत आणि आल्या तर लवकर दूर होतात. पण हाती पैसा असूनही काही कारणामुळे ही मंडळी दुःखी असतात. आजारपण, प्रेमातील अपयश अशा खासगी कारणांमुळे ही मंडळी दुःखी असतात.
अंगठ्यावर तीळ असलेली व्यक्ती मेहनती असते. प्रामाणिक असते. सामाजिक प्रतिष्ठा मिळवते. पण शुक्र पर्वतावर अंगठ्याखाली तीळ असेल तर संबंधित व्यक्ती कामुक असते. अशा व्यक्तीची आयुष्यात अनेक 'अफेअर' असू शकतात. यामुळे त्यांना कौटुंबिक पातळीवर काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण या मंडळींना आर्थिक अडचणी जाणवत नाहीत आणि जाणवल्या तर लवकर दूर होतात.
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.