Name Astrology । मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नावाचा प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर आणि जीवनावर खूप प्रभाव पडत असतो. व्यक्तीचे नाव खूप महत्वाचे आहे नावावरूनच व्यक्तीची ओळख निर्माण होते. नाव संबधित व्यक्तीच्या कार्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर खोलवर छाप सोडते. ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या कुंडलीत दिलेले नाव आणि खरे नाव यांच्या आधारावर गणना केली जाते. व्यक्तीची ही नावे त्याची राशी देखील ठरवतात. (People with these 3 names are very lucky in terms of wealth).
अधिक वाचा : कर्नालमध्ये ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
दरम्यान, नावाच्या पहिल्या अक्षरावरून एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेता येते. आज आपण अशाच काही अक्षरांबद्दल भाष्य करणार आहोत ज्या अक्षरांची सुरूवात खूप भाग्यशाली मानली जाते. त्यांच्या जीवनात सुख-सुविधांची कमतरता भासत नाही. पैशाच्या बाबतीत ते खूप भाग्यवान सिद्ध होतात. चला तर म जाणून घेऊया कोणत्या नावाच्या लोकांना कधीच पैशाची कमतरता भासत नाही.
ज्या लोकांचे नाव A अक्षराने सुरू होते ते मेहनती आणि प्रामाणिक असतात. या राशीच्या लोकांना अचानक एखाद्या क्षेत्रात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यश मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात आणि काही काळानंतर त्यांना यश देखील मिळते. संपत्तीच्या बाबतीत ते भाग्यवान मानले जातात.
ज्या लोकांचे नाव R अक्षराने सुरू होते ते बुद्धिमान आणि मेहनती असतात. त्यांच्यात आत्मविश्वासाची काहीच कमतरता नसते. त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. त्यांचे नशीब अचानक बदलते. हे लोक कठोर परिश्रम करून जीवनात भरपूर पैसे कमवू शकतात.
ज्या लोकांचे नाव S अक्षराने सुरू होते त्यांना त्यांच्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते, परंतु ते प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातात आणि त्यात यश मिळवतात. ही लोक मेहनती आणि बुद्धिमान असतात. जीवनात उच्च स्थानी झेप घेतल्यानंतरच ते मोकळा श्वास घेतात. त्यांच्या मेहनतीचे एक दिवस नक्कीच फळ मिळते.
ज्या लोकांचे नाव V अक्षराने सुरू होते, ते आपल्या मेहनतीमुळे आणि मनाने आपले नावलौकिक लवकर मिळवतात. या लोकांनी एखादी गोष्ट करायची ठरवली की ती गोष्ट तडीस नेऊनच शांत बसतात. या लोकांना कधीही कोणतेही काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.