Astrology: एप्रिल २०२३ पर्यंत राहू या ३ राशींना देणार शुभ लाभ; करिअरमध्येही मिळणार मोठे यश 

भविष्यात काय
Updated May 14, 2022 | 12:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahu In Meen Rashi । राहू-केतू यांचे इतर ग्रहांसारखे शारीरिक स्वरूप नसले तरी ते आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात. राहू नेहमीच वाईट परिणाम देतो असे बहुतेकांना वाटते पण ज्योतिष शास्त्रानुसार असे विचार करणे आणि म्हणणे चुकीचे आहे.

rahu give auspicious benefits to these 3 zodiac signs till April 2023
एप्रिल २०२३ पर्यंत राहू या ३ राशींना देणार शुभ लाभ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राहू-केतू यांचे इतर ग्रहांसारखे शारीरिक स्वरूप नसले तरी ते आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात.
  • १२ एप्रिल रोजी राहूने मेष राशीत प्रवेश केला असून ३० ऑक्टोबरपर्यंत तो याच राशीत राहील.
  • राहू संक्रमणाचा काळ कन्या राशीसाठी खूप शुभ दिसत आहे.

Rahu In Meen Rashi । मुंबई : राहू-केतू यांचे इतर ग्रहांसारखे शारीरिक स्वरूप नसले तरी ते आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात. राहू नेहमीच वाईट परिणाम देतो असे बहुतेकांना वाटते पण ज्योतिष शास्त्रानुसार असे विचार करणे आणि म्हणणे चुकीचे आहे. राहू केवळ वाईटच नाही तर चांगले देखील परिणाम देतो. पण त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम कुंडलीतील स्थानावर अवलंबून असतात. १२ एप्रिल रोजी राहूने मेष राशीत प्रवेश केला असून ३० ऑक्टोबरपर्यंत तो याच राशीत राहील. चला तर म जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हा काळ फायदेशीर असेल. (rahu give auspicious benefits to these 3 zodiac signs till April 2023). 

अधिक वाचा : IPL २०२२ मध्ये हे खेळाडू पहिल्या सामन्याच्या प्रतिक्षेत

वृषभ राशी 

मेष राशीतील राहूचे संक्रमण या वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. या काळात करिअरमध्ये लाभ मिळण्याच्या अनेक विशेष संधी मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातही नफा मिळवण्याच्या अनेक विशेष संधी मिळतील.

मिथुन राशी 

या कालावधीत मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. राहूच्या या संक्रमण काळात करिअरमध्ये लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. व्यवसायात चांगला नफा मिळण्याचीही शक्यता आहे. उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल.

कन्या राशी 

राहू संक्रमणाचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ दिसत आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. कारण या काळात तुम्हाला जवळपास प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यातही यशस्वी व्हाल. काही नवीन काम सुरू करता येईल. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी