Astrology: २०२३ पर्यंत राहू मंगळ राशीत राहणार; या ३ राशींना होणार चांगला आर्थिक लाभ 

भविष्यात काय
Updated May 06, 2022 | 13:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahu Planet Transit 2022 । ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. या राशी बदलाचा परिणाम थेट मानवी जीवनावर होतो आणि हा राशी बदल काही व्यक्तींसाठी भाग्यवान तर काही व्यक्तींना अशुभ लाभ देणारा असतो.

 Rahu Grah will remain in Mars till 2023, these 3 zodiac signs will have good financial benefits
२०२३ पर्यंत राहू मंगळ राशीत राहणार, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो.
  • राशी बदलाचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत असतो.
  • राहू या ग्रहाने मिथुन राशीतून ११ व्या भावात प्रवेश केला आहे.

Rahu Planet Transit 2022 । मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. या राशी बदलाचा परिणाम थेट मानवी जीवनावर होतो आणि हा राशी बदल काही व्यक्तींसाठी भाग्यवान तर काही व्यक्तींना अशुभ लाभ देणारा असतो. ( Rahu Grah will remain in Mars till 2023, these 3 zodiac signs will have good financial benefits). 

वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला शेअर्स, प्रवास, विदेशातील प्रवास, महासाथी, राजकारण इत्यादींचा कारक म्हटले आहे. त्यामुळे राहू ग्रहाच्या संक्रमणाचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरू शकते. चला तर म जाणून घेऊया कोणत्या आहेत या लकी राशी. 

अधिक वाचा : पुतण्याने काकाच्या नावावर काढले १६ लाखांचे कर्ज

१) मिथुन राशी 

राहू या ग्रहाने तुमच्या राशीतून ११ व्या भावात प्रवेश केला आहे, ज्याला उत्पन्न आणि लाभाचा भाव असे म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्ही व्यवसायात चांगला नफा कमवू शकता. तसेच तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो. तसेच या काळात करियर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा आधिपत्य आहे.

बुध व्यवसाय देणारा ग्रह 

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा व्यवसाय देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. तसेच तुम्ही शेअर बाजारात देखील गुंतवणूक करू शकता. आर्थिक लाभाची जोरदार चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर या काळात राजकारणातही चांगले यश मिळू शकते. मात्र लक्षणीय बाब म्हणजे इथे पाहण्यासारखे असेल की राहू ग्रह तुमच्या कुंडलीतील कोणत्या भावात आणि कोणत्या स्थितीत विराजमान आहे. 

२) कर्क राशी 

तुमच्या संक्रमण कुंडलीत राहू देवाने दहाव्या भावात संक्रमण केले आहे. ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरीचा भाव असे म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जे आधीच नोकरीत कार्यरत आहेत त्यांचेही प्रमोशन किंवा मूल्यांकन मिळू शकते. व्यवसायात अनपेक्षित यश मिळू शकते. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तोही सुरू करू शकता. तुम्हाला शेअर बाजारातही नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. याचा अर्थ तुम्ही घर किंवा वाहन घेण्याचा निर्णय घेऊ शकता. कर्क राशीवर चंद्र ग्रहाचे राज्य आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीत चंद्र कोणत्या राशीत आहे हे पाहावे लागेल. तसेच चंद्र आणि राहू ग्रहांचा संबंध कसा आहे हे देखील पाहण्याजोगे आहे. 

३) मीन राशी 

राहू या ग्रहाने तुमच्या संक्रमण कुंडलीतून दुसऱ्या भावात भ्रमण केले आहे. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हटले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. तसेच तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. सोबतच यावेळी तुमचा पराक्रम आणि धैर्य वाढेल आणि गुप्त शत्रूंचा नाश करण्यात तुम्हाला यश येईल. राजकारणात खूप प्रयत्न केले तरच यश मिळू शकते. जर तुम्हाला शेअर्स आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता. लाभाची चिन्हे आहेत. बृहस्पति हा मीन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे ज्या लोकांचा व्यवसाय गुरू ग्रहाशी संबंधित आहे, त्यांना या काळात चांगली कमाई होऊ शकते. यासोबतच तुमच्या कुंडलीत गुरु आणि राहू देव या ग्रहाचा संबंध कसा आहे हेही इथे पाहावे लागेल. म्हणजेच ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी