Rahul Gandhi : मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि नंतर लगेचच जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला. मात्र, आता प्रश्न आहे की, राहुल गांधींना जामीन मिळणं इतकंच पुरेसं आहे की, त्यांना भविष्यात आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे नरेंद्र मोदींसमोर आव्हान उभं करतील की नाही? जाणून घेऊयात ज्योतिषी सचिन मल्होत्रा यांचा अंदाज काय सांगतो.
नुकत्याच पूर्वेकडील तीन राज्यांच्या निवडणुका पार पडल्या, जेथे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाचा सामना करावा लागला असतानाच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सूरत येथील जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदी आडनावावरुन केलेल्या वादग्रस्त विधानानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांना आता जामीन मिळाला आहे. मात्र, पुढील 30 दिवसांत त्यांना हायकोर्टात या शिक्षेच्या विरुद्ध याचिका दाखल करावी लागेल.
हे पण वाचा : उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
दुसरीकडे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने जोरदार गदारोळ घालत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या एका विधानावरुन भाजपने ही मागणी केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राहुल गांधींची कुंडली पाहून असे दिसते की, या वर्षी जुलै महिन्यापर्यंतचा काळ राहुल गांधींसाठी अडचणींचा असणार आहे. कारण, त्यांच्या कुंडलीत राहु गुरू चा योग सुरू आहे.
हे पण वाचा : गरोदरपणात कारले खावे की नाही?
राहुल गांधींसाठी हा काळ कठीण का सुरू आहे? हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुंडलीवर नजर टाकली असता असे दिसते की, त्यांची जन्म कुंडली 19 जून 1970 रोजी दुपारी 2 वाजून 28 मिनिटांची आहे. या कुंडलीत तूळ लग्न उदित आहे. जन्म लग्नात आणि नवांश कुंडली दोन्हीमध्ये गुरू वक्री होऊन विराजमान आहेत. कुंडलीत राहु पंचम बावात तर सूर्य आणि मंगळ दोन्ही नवम म्हणजेच भाग्य भावात आहेत.
हे पण वाचा : रात्रभर जागल्याने होऊ शकतात हे आजार
राहुल गांधी सध्या राहुच्या महादशामध्ये गुरूच्या अंतर्दशात 26 डिसेंबर 2021 पासून सुरू आहे जे 21 मे 2024 पर्यंत सुरू आहे. याच ग्रहांच्या दरम्यान मे महिन्यात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि नंतर मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. ज्या राहुल गांधी यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकतात.
हे पण वाचा : हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट
शुक्राची प्रत्यंतर दशा 2 मार्चपासून 26 जुलै 2023 पर्यंत आहे. प्रत्यंतर दशनाथ शुक्र आपल्या कुंडलीत दशम भावात आरोही स्वामी असूनही हा शुक्र दोन्ही बाजूंनी अशुभ अशा ग्रहांनी वेढलेला आहे. एकीकडे शुक्र तर दुसरीकडे मंगळ-सूर्याला घेरलेलं आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत राहुल गांधी यांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचं दिसतं. तसेच विरोधकही त्यांना सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.