Rahu Gochar 2022: मिथुन, कर्क आणि मीन राशीच्या लोकांवर राहूची विशेष कृपा; २०२३ पर्यंत होणार मालामाल

भविष्यात काय
Updated Jun 14, 2022 | 10:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rahu Gochar 2022 । वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदल असतो. या राशी परिवर्तनाचा परिणाम मानवी जीवनावर तसेच संपूर्ण पृथ्वीवरील सृष्टीवर होतो.

Rahu's special grace on Gemini, Cancer and Pisces people
मिथुन, कर्क आणि मीन राशीच्या लोकांवर राहूची विशेष कृपा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदल असतो.
  • मिथुन, कर्क आणि मीन राशीच्या लोकांवर राहूची विशेष कृपा.
  • राहू ग्रह कर्क राशीतून दहाव्या भावात प्रवेश करत आहे.

Rahu Gochar 2022 । मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक काळानंतर आपली राशी बदलत असतो. या राशी परिवर्तनाचा परिणाम मानवी जीवनावर तसेच संपूर्ण पृथ्वीवरील सृष्टीवर होतो. राशीचा हा बदल काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ परिणाम देतो. लक्षणीय बाब म्हणजे राहू ग्रहाने १२ एप्रिल रोजी मंगळची राशी मेष राशीत प्रवेश केला आहे. (Rahu's special grace on Gemini, Cancer and Pisces people). 

दरम्यान, ज्योतिषशास्त्रानुसार राहु ग्रह शेअर्स, प्रवास, विदेशी प्रवास, महासाथी, राजकारण इत्यादींचा कारक मानला गेला आहे. आता राहूच्या या संक्रमणाचा काही लोकांवर विशेष परिणाम होणार आहे. राहू देवाच्या या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या तीन राशी. 

अधिक वाचा : अनिल देशमुखांची Default Bail साठी न्यायालयात धाव

मिथुन राशी 

मिथुन राशीच्या लोकांच्या संक्रमण कुंडलीतून राहू देव ११ व्या भावात प्रवेश करत आहे. याला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हटले जाते. यावेळी मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला पैसा मिळू शकतो. यासोबतच त्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्गही निर्माण होऊ शकतात. परदेशातून चांगले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. तसेच करियर आणि व्यवसायात प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीवर बुध ग्रहाचे अधिपत्य आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यवसाय देणारा ग्रह म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळेल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. आर्थिक लाभाचे चांगले संकेत आहेत. त्याचबरोबर राजकारणातही यश मिळू शकते. 

कर्क राशी 

राहू ग्रह कर्क राशीतून दहाव्या भावात प्रवेश करत आहे. याला कार्यक्षेत्र आणि नोकरीचे स्थान म्हटले जाते. त्यामुळे या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. तसेच जे आधीच नोकरीत आहेत त्यांचे प्रमोशन होऊ शकते. यासोबतच व्यवसायातही प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो देखील सुरू करू शकता. तुम्ही शेअर मार्केटमध्येही पैसे कमवू शकता. या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आता कुंडलीत चंद्र कोणत्या राशीत आहे आणि राहू देवाची स्थितीही काय आहे हे पाहावे लागेल. 

मीन राशी 

मीन राशीच्या लोकांसाठी राहू ग्रहाचे संक्रमण शुभ असल्याचे सिद्ध होऊ शकते. कारण राहू ग्रहाने दुसऱ्या भावात संक्रमण केले आहे. त्याला पैसा आणि वाणीचे स्थान म्हणतात. या कालावधीत तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तसेच करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमचे सामर्थ्य वाढेल आणि गुप्त शत्रूंचा नाश होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. राजकारणात तुम्ही खूप प्रयत्न करत असाल तर तुम्हाला खूप यश मिळू शकते. जर तुम्ही शेअर्स आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवले तर ते तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. लाभाची चिन्हे आहेत. मीन राशीवर गुरू ग्रहाचे अधिपत्य आहे. या कारणास्तव ज्या लोकांचा व्यवसाय गुरू ग्रहाशी संबंधित आहे ते या काळात पैसे कमवू शकतात. 

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी