राशीभविष्य : मंगळवार, २६ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या ऑक्टोबरच्या शेवटच्या मंगळवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, २६ ऑक्टोबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

rashi bhavishaya 26 october 2021 daily horoscope
राशीभविष्य : मंगळवार, २६ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रामाणिकपणा, प्रसंगी सत्य गोड बोलत सांगणे,
  • वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: शब्द, पैसा आणि वेळ यांचे महत्त्व ओळखल्यास प्रगती होईल.
  • कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  वाद टाळणे आणि ओळखी वाढवून स्वार्थ साधणे आज जमल्यास प्रगती होईल.

आजचे राशी भविष्य २६ ऑक्टोबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (rashi bhavishaya 26 october 2021 daily horoscope  )

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: बुद्धीचा वापर करणे हिताचे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. प्रगती होईल.  शुभ रंग - गुलाबी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: शब्द, पैसा आणि वेळ यांचे महत्त्व ओळखणे हिताचे. घाईपेक्षा संयम लाभदायी ठरेल. दिवस चांगला आहे. प्रगतीचा योग आहे. शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रामाणिकपणा, प्रसंगी सत्य गोड बोलत सांगणे, प्रयत्नांमधील सातत्य यामुळे यश लाभेल. सहकाऱ्यांची साथ लाभेल. प्रगतीचे योग आहेत. शुभ रंग - मोरपिशी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: हुशारीने काम करा. कधी स्पष्ट बोलावे, कधी साखरेत घोळवून सत्य सांगावे आणि कधी मौन राखावे हे जमले तर यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रगती होईल. शुभ रंग - हिरवा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: कायदा, नियम यांचे पालन करणे आणि वाद टाळणे हिताचे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण खात्री करुन घेणे लाभाचे. शुभ रंग - किरमीजी.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: कष्ट करणाऱ्याला यश मिळेल. अडचणींमधून मार्ग निघेल. कौटुंबिक सुख लाभेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागेल.  शुभ रंग - पोपटी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: सामर्थ्य आणि क्षमता ओळखून त्यांचा पुरेपूर वापर कराल. वास्तवाचे आणि व्यावहारिकतेचे भान राखून प्रगती कराल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: शब्द, पैसा आणि वेळ यांचे महत्त्व ओळखल्यास प्रगती होईल. वाद टाळणे आणि प्रसंगी गोड बोलून काम साधणे हिताचे.  शुभ रंग - नारिंगी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कामावर लक्ष केंद्रीत करा. वाद टाळून प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. प्रगती होईल.  शुभ रंग - पिवळा. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: ओळखी वाढवाल आणि त्यांचा व्यवस्थित वापर कराल. गोड बोलून प्रभाव पाडाल. प्रगती कराल. शुभ रंग - निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  वाद टाळणे आणि ओळखी वाढवून स्वार्थ साधणे आज जमल्यास प्रगती होईल. गृहसौख्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. शुभ रंग - राखाडी.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: संयम आपल्यासाठी लाभदायी आहे. प्रयत्नांमधील सातत्य प्रगतीसाठी हितकारक आहे. आर्थिक प्रगती होईल. इतरांवर प्रभाव पाडाल.  शुभ रंग - सोनेरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी