शनी जयंती २०२०: पाहा तुमच्या राशीवर कसा असेल शनी देवतेचा प्रभाव

भविष्यात काय
Updated May 22, 2020 | 20:56 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

शनी जंयतीला तुमच्या राशीवर काय परिणाम होईल आणि २०२० हे वर्ष तुमच्या राशीसाठी कसे असेल या बाबत घ्या सविस्तर जाणून...

Rashi Bhavishya On the Eve of Shani Jayanti
शनी जंयतीचा तुमच्या राशीवर होणारा परिणाम 

थोडं पण कामाचं

 • शनी जयंती २०२०
 • बारा राशींवर शनी जंयतीचा नेमका परिणाम काय असेल
 • कोणत्या राशीवर शनी देवाचा प्रकोप होऊ शकतो? घ्या जाणून

शुक्रवार, २२ मे म्हणजेच आज देशभरात शनी जंयती साजरी केली गेली. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या आमावस्येला शनी देवाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी शनी देव जंयतीच्याच दिवशी त्याच्या मकर राशीत आहे ज्याचा सर्वच राशीवर शुभ अशुभ परिणाम जाणवेल. तर जाणून घेऊयात कोणत्या राशीवर शनी देवाचा लाभ राहील आणि कोणत्या राशीवर शनी देवाचा प्रकोप होऊ शकतो. 

मेष:  मेश राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • नियोजनानुसार कामे होऊ शकणार नाहीत 
 • कांमामध्ये अडथळे येण्याची शक्यता
 • गुंतवणूक आणि इतर व्यवहारांसाठी अनुकूल वेळ नाही
 • आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो 
 • व्यापारात संयमपणे पावले टाकावी लागतील
 • वैवाहिक आयुष्यात चढ उतार येतील 

वृषभ: वृषभ राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • वृष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो
 • जुन्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात आणि गुंतवणुकीत फायदा मिळू शकतो
 • धन लाभामुळे वित्तीय स्थिती सुधारु शकते 

मिथून: मिथून राशीवर शनी जयंतीचा परिणाम 

 • नोकरी आणि व्यापारासंबधीच्या कामात विलंब होऊ शकतो
 • आर्थिक देवाण- घेवाण आणि गुंतवणूक टाळावी 
 • गरजेपेक्षा अधिक खर्च केल्यास नुकसान सोसावे लागू शकते
 • आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
 •  वैवाहिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो

कर्क: कर्क राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • शनी देवाच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यापारात फायद्याचे योग आहेत. पंरतू थेट फायद्यासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते
 • मेहनतीनंतर कामात यश मिळेल
 • नोकरी करत असाल तर बदली होऊ शकते 
 • नोकरी आणि व्यापारात नवीन काही करणार असल्यास अनुकूल वेळ 
 • संपत्ती अथवा वाहन खरेदीचा योग  

सिंह: सिंह राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • नोकरी आणि व्यवसायात अडचणीचा सामना करावा लागू शकतो
 • या काळात दैनंदिन खर्चात वाढ होऊ शकते 
 • गुंतवणूक आणि देवाण-घेवाणीसाठी योग्य वेळ नाही
 • तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता 
 • प्रेम संबधात रुसवे फुगवे निर्माण होऊ शकतात

कन्या: कन्या राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • नोकरी आणि व्यापारात नव्या योजना बनवल्यास फायदा होऊ शकतो
 • शनी देवाच्या शुभ प्रभावामुळे प्रगतीचे योग 
 • जास्त मेहनत करण्याचा काळ 

तूळ: तूळ राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • या राशीच्या लोकांना शत्रूपासून सावध राहण्याची गरज 
 • अपत्यांकडून चिंतेत भर पडू शकते 
 • खर्चांमध्ये वाढ होऊ शकते 
 • प्रेम संबधात तणावपूर्ण स्थिती राहील 
 • नोकरी आणि व्यापारात जास्तीची मेहनत करण्याची गरज

वृश्चिक: वृश्चिक राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • शनी देवाच्या शुभ प्रभावामुळे करिअरसाठी उत्तम वेळ 
 • प्रगतीचे योग; योग्य मेहनतीची जोड देण्याची गरज
 • धन लाभ झाल्याने आर्थिक परिस्थीती सुधारेल
 • नोकरी आणि व्यापारासाठी उत्तम काळ 

धनु: धनु राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • नोकरी आणि व्यवसायात लाभ होईल
 • अल्पसंतुष्ट राहाल 
 • जास्तीच्या मेहनतीची गरज     

मकर: मकर राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • आर्थिक नुकसानीची शक्यता 
 • कुटुंबात अशांततेचे वातावरण राहील; त्यामुळे आपण शांत राहावे 
 • देवाण-घेवाण आणि गुंतवणूक करु नये 
 • आरोग्यासंबधी विशेष काळजी घेण्याची गरज  

कुंभ: कुंभ राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • तब्येतीची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता 
 • आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते
 • संतती बाबत अडचणीचा सामना करावा लागू शकतो
 • शत्रुपासून सावध राहण्याची आवश्यकता 
 • कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा
 • वैवाहीक जिवनात अडचणीचा सामना करावा लागू शकतो 

मीन: मीन राशीवर शनी जयंतीचा परिणाम

 • शनी देवाच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यापारासाठी चांगला काळ 
 • मेहनतीचे फळ मिळेल
 • देवाण-घेवाण आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो
 • धन लाभ होण्याची शक्यता 
 • नव्या योजना बनवून काम केल्यास निश्चित स्वरुपात यश मिळेल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी