Samudrik Shastra : डोळ्यांवरून ओळखा माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभाव

Samudrik Shastra : Recognise human future and his nature via eyes : सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी डोळ्यांच्या रचनेवरून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा तसेच त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. तसेच संबंधित व्यक्तीचे सर्वसाधारण भविष्य सांगता येते.

Samudrik Shastra : Recognise human future and his nature via eyes
डोळ्यांवरून ओळखा माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभाव 
थोडं पण कामाचं
  • डोळ्यांवरून ओळखा माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभाव
  • सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी डोळ्यांच्या रचनेवरून संबंधित व्यक्तीचे भविष्य सांगणे शक्य
  • गरूड पुराणात आहे सामुद्रिक शास्त्र

Samudrik Shastra : Recognise human future and his nature via eyes : सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या रचनेआधारे संबंधित व्यक्तीचे व्यक्तीमत्व, त्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्या व्यक्तीचे सर्वसाधारण भविष्य सांगता येते. गरूड पुराणात सामुद्रिक शास्त्राविषयी सविस्तर माहिती मिळते. सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी डोळ्यांच्या रचनेवरून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा तसेच त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. तसेच संबंधित व्यक्तीचे सर्वसाधारण भविष्य सांगता येते. आता आपल्या डोळ्यांनी वाचा की डोळ्यांची रचना कशी असेल तर संबंधित व्यक्तीचे भविष्य काय असेल?

  1. ज्यांचे डोळे कमी उघडे असतात, ते दयाळू असतात. कोणालाही दुखावत नाहीत. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न सतत करत असतात. ही मंडळी बुद्धिमान आणि भावनाप्रधान असतात.
  2. जाड डोळ्यांची माणसं कमी भावनिक असतात. स्वभावाने क्षुद्र असतात. कायम स्वार्थी विचार करतात. आर्थिकदृष्या अनेकदा फायद्यात असतात. 
  3. ज्यांचे डोळे लहान असतात असे मर्यादीत शिक्षण घेतात किंवा कमी शिकतात. आयुष्यात दीर्घकाळ संघर्ष करत जगतात.
  4. कमळासारखे सुंदर डोळे असलेले भाग्यवान असतात. आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात. त्यांना इतरांकडून अनेकदा आदर मिळतो.
  5. ज्यांचे डोळे मागून वरच्या बाजूने वर असतात ते सरासरी बुद्धिचे असतात. नाती जपण्याला प्राधान्य देतात. आनंदी असतात.
  6. ज्यांच्या डोळ्यात लाल धागे असल्यासारखे दिसते ते कामुक असतात. आनंदी असतात. या मंडळींकडून विश्वासघात होण्याचा धोका असतो. पण ही मंडळी स्वार्थाचा विचार करतात आणि तो साधला की आनंदी राहतात.

महत्त्वाचे - हा मजकूर काही गृहितकांच्या तसेच माहितीच्या आधारे तयार केला आहे. 'टाइम्स नाउ मराठी' हा मजकूर अचूक असल्याची ग्वाही देत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी