Saturn Transit 2022 : कुंभ राशीत गोचर करणार शनि, दोन राशींना होणार त्रास

saturn transit 2022 shani dhaiya on kark vrishchik shani dev is coming to give trouble to these two zodiac signs : आज (शुक्रवार २९ एप्रिल २०२२) शनि ग्रह (शनि महाराज) कुंभ राशीत गोचर करणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर शनि स्वामी राशीत अर्थात कुंभ राशीत गोचर करणार आहे.

saturn transit 2022 shani dhaiya on kark vrishchik shani dev is coming to give trouble to these two zodiac signs
कुंभ राशीत गोचर करणार शनि  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कुंभ राशीत गोचर करणार शनि
  • दोन राशींना होणार त्रास
  • कर्क आणि वृश्चिक राशीवर शनिची ढय्या सुरू होईल

saturn transit 2022 shani dhaiya on kark vrishchik shani dev is coming to give trouble to these two zodiac signs : आज (शुक्रवार २९ एप्रिल २०२२) शनि ग्रह (शनि महाराज) कुंभ राशीत गोचर करणार आहे. तब्बल ३० वर्षांनंतर शनि स्वामी राशीत अर्थात कुंभ राशीत गोचर करणार आहे. शनिचे राशी परिवर्तन ही एक खगोलीय घटना असल्याचे सांगितले जात आहे. पण ज्योतिषी या घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत. शनिचे कुंभ राशीतील गोचर कर्क आणि वृश्चिक या दोन राशींसाठी त्रासदायक असल्याचे मत अनेक ज्योतिषांनी व्यक्त केले. 

शनि देवाला कलियुगाचा दंडाधिकारी असेही म्हणतात. हा दंडाधिकारी ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीच्या प्राणीमात्रांच्या आयुष्यावर परिणाम होतो, असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय सावकाश पुढे सरकणारा शनि ग्रह तब्बल तीस वर्षांनंतर २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. एका राशीत शनि ग्रहाचे वास्तव्य अडीच वर्ष असते. आता कुंभ राशीत प्रवेश करणारा शनि त्या राशीत अडीच वर्ष असेल. 

शनिला न्यायाधीश किंवा न्याय करणारा ग्रह असेही म्हणतात. आपल्या वाईट कृत्यांच्या शिक्षा शनि आपल्याला देतो. यामुळेच शनिच्या प्रवेशाचा परिणाम कुंभ राशीच्या प्राणीमात्रांवर दिसून येईल. तसेच शनिच्या कुंभ राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींच्या प्राणीमात्रांच्या आयुष्यात दिसून येतील. त्यांचा भाग्योदय होईल. या राशींच्या नागरिकांना आर्थिक लाभ होईल. तर कर्क आणि वृश्चिक या दोन राशींना त्रासांना सामोरे जावे लागण्याची चिन्ह आहेत. 

शनि पीडेपासून कोणीही वाचलेले नाही. अगदी देव आणि दानव यांनाही शनिपीडेचा त्रास झाला आहे. याच कारणास्तव शनि पीडेचा त्रास कमी व्हावा यासाठी शनिची पूजा केली जाते.

शनि जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करेल त्यावेळी धनु राशीची साडेसाती संपेल. मीन राशीची साडेसाती सुरू होईल. मिथुन आणि तुळ राशीवरील शनिची ढय्या संपेल. कर्क आणि वृश्चिक राशीवर शनिची ढय्या सुरू होईल. 

शनि ढय्या सुरू झाल्यामुळे कर्क आणि वृश्चिक राशीवर होणारे परिणाम....

  1. कर्क रास : Cancer : शनिची ढय्या सुरू झाल्यामुळे तब्येत जपावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. काही अडचणी जाणवतील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून काम करावे लागेल. आर्थिक नियोजनावर भर देणे आणि अनावश्यक खर्च टाळून बचत करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
  2. वृश्चिक रास : Scorpio : खर्च वाढण्याची आणि तब्येतीच्या कुरबुरी सुरू होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनावर भर देणे आणि अनावश्यक खर्च टाळून बचत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नियम कायदे पाळणे आवश्यक आहे. दुखापतीचा धोका आहे, काळजी घ्यावी. प्रेमात सावध राहा. लग्न होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. अहंकार आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. संयम राखा. चुकीच्या मार्गाचा वापर करुन झटपट लाभ मिळविणे टाळा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी