शनि मकर राशीत येणार, या राशींच्या नागरिकांना होणार फायदा

Saturn transit 2022, Shani Vakri, Shani Rashi Parivartan 2022, Second Phase Of Saturn Transit : शनि ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ देतो असे म्हणतात. यंदाच्या वर्षी (२०२२) शनि ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करणार असे पंचागात नमूद आहे.

Saturn transit 2022, Shani Vakri, Shani Rashi Parivartan 2022, Second Phase Of Saturn Transit
Saturn transit 2022 : शनि मकर राशीत येणार, या राशींच्या नागरिकांना होणार फायदा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शनि मकर राशीत येणार, या राशींच्या नागरिकांना होणार फायदा
  • शनि ग्रहाच्या प्रवासाचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने
  • धनु, मकर आणि कुंभ या तीन राशींची साडेसाती,

Saturn transit 2022, Shani Vakri, Shani Rashi Parivartan 2022, Second Phase Of Saturn Transit : शनि ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ देतो असे म्हणतात. यंदाच्या वर्षी (२०२२) शनि ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करणार असे पंचागात नमूद आहे. यातील पहिले परिवर्तन २९ एप्रिल २०२२ रोजी झाले. शनि ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला. जून २०२२ पासून शनि ग्रहाची वक्री चाल सुरू झाली. शनि ग्रह १२ जुलै २०२२ रोजी वक्री चालीमुळे मकर राशीत प्रवेश करेल. मकर राशीत शनि ग्रहाचा मुक्काम जानेवारी पर्यंत आहे. शनि ग्रह १७ जानेवारी २०२३ रोजी पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ राशीतील शनि ग्रहाचा मुक्काम २९ मार्च २०२५ पर्यंत असेल. 

शनि ग्रहाच्या या प्रवासाचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येईल, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, शनि ग्रह १२ जुलै २०२२ रोजी प्रवेश करेल. यामुळे धनु, मकर आणि कुंभ या तीन राशींची शनि साडेसाती सुरू राहील. मिथुन आणि तुळ राशीवर शनि ढय्या सुरू राहील. 

वृश्चिक राशीच्या नागरिकांसाठी हा कालावधी अतिशय चांगला आहे. परदेश प्रवासाचा योग आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने विचारपूर्वक केलेली गुंतवणूक आर्थिक लाभ मिळवून देईल.

कुंभ राशीच्या नागरिकांनी प्रामाणिकपणे काम करावे, दिलेली प्रत्येक जबाबदारी शांतपणे आणि व्यवस्थित पार पाडावी. नियम आणि कायद्यांचे पालन करावे. यामुळे शनिची कृपा राहील. 

मीन राशीच्या नागरिकांना आर्थिक लाभाचा योग आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने विचारपूर्वक केलेली गुंतवणूक आर्थिक लाभ मिळवून देईल. नोकरी आणि व्यवसाय यापैकी ज्या क्षेत्रात आहात तिथे प्रगती होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी