मुंबई: ज्योतिषशास्त्रामध्ये(astrology) जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून(zodiac sign) दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो तेव्हा साहजिकपणे त्याचा परिणाम त्या राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर होतो. दरम्यान त्या व्यक्तीच्या जीवनावर होणारे हे परिणाम चांगले अथवा वाईट असू शकतात. या महिन्यात साधारणत: सर्व ग्रहांनी आपली रास बदलली आहे आणि या २९ एप्रिलला न्यायदेवता शनीदेवही आपले राशी परिवर्तन करत आहेत. शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. कुंभ शनिदेवाची स्वराशी मानली जाते. Saturn transits will be positive for this 3 zodiac sign
अधिक वाचा - सावधान! मानवलाही होतो Bird Flu, चीनमध्ये आढळला पहिला रुग्ण
वैदिक ज्योतिषानुसार शनीग्रह मंद वेगाने भ्रण करत असते. त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागतो. त्या हिशेबाने शनी आपली रास कुंभमध्ये तब्बल ३० वर्षांनी संक्रमण करत आहेत. शनीदेवाला न्यायाधीशाचे पद मिळाले आहे. शनिदेव हे व्यक्तीच्या चांगल्या वाईट कामाचा हिशेब ठेवतात. आणि त्या व्यक्तीला त्या हिशेबाने फळ देतात. जाणून घेऊया शनिचे हे संक्रमण कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
२९ एप्रिलपासून मेष राशींच्या व्यक्तींसाठी चांगले दिवस सुरू होत आहेत. मेष राशीच्या ११व्या भागात शनीचे संक्रमण होत आहे. हे लाभाचे आणि इनकमचे स्थान मानले जाते. यामुळे या दरम्यान तुम्हाला बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. एखादी मोठी डील फायनल करू शकता. शनी ग्रह दशम भावाचे स्वामी मानले जातात. यासाठी यावेळेस करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची चिन्हे आहेत. नव्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. सोबतच एखादा प्रवास घडू शकता. या दरम्यान पैशांचा ओघ वाढेल. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. जुन्या रोगांपासून मुक्ती मिळेल.
ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह या राशीच्या दशम स्थानावर संक्रमण करतील. हे स्थान कार्यक्षेत्र आणि जॉबचे स्थान मानले जाते. यामुळे या अवधीत बिझनेसमध्ये फायदा होईल. करिअरमध्ये चांगली वाढ मिळेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर फायदा होईल. मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. या राशीवर शुक्र देवाचे अधिपत्य असते. यावेळेस जी कामे हातात घ्याल त्यात यश मिळेल.
अधिक वाचा - IPL Record: आर. अश्विनने IPLमध्ये रचला इतिहास
या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे परिवर्तन अत्यंत शुभ असणार आहे. शनीचे संक्रमण होताच या राशीच्या जातकांची साडेसातीतून मुक्तता होईल. प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. शनी या राशीच्या तिसऱ्या भावात गोचर करत आहे. या दरम्यान कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. जुन्या आजारांपासून सुटका होईल. कामात यश मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील.