तीस वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार शनी, खुलणार 4 राशीच्या लोकांचे भाग्य

शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच 4 राशींचे भाग्य बदलेल. जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

Saturn will enter Aquarius after 30 years
तीस वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार शनी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • धनू राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते.
  • तीस वर्षांनंतर शनी कुंभात म्हणजेच स्वतःच्या राशीत प्रवेश करणार असून या राशीत शनीचा प्रवेश होताच 4 राशींच्या लोकांचे नशीब बदलेल.
  • गुंतवणूक करायची असेल तर मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ

Shani Rashi Parivartan 2022: नवी दिल्ली : जेव्हा-जेव्हा शनीच्या हालचालीत बदल होतो, तेव्हा त्याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. तीस वर्षांनंतर शनी (Saturn) कुंभात (Aquarius) म्हणजेच स्वतःच्या राशीत (zodiac) प्रवेश करणार असून या राशीत शनीचा प्रवेश होताच 4 राशींच्या लोकांचे नशीब बदलेल. पैसा(Money) मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. रखडलेली कामे(Work) पुन्हा मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत ज्यासाठी शनीची ही चाल फायदेशीर ठरेल.

मेष राशी:

या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. आर्थिक स्थिती सुधारणार असून पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. प्रवासातून पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. जुन्या आजारापासून आराम मिळेल.

वृषभ राशी: 

या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण लाभदायक ठरेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यापाऱ्यांना विशेष लाभ होईल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.

सिंह राशी: 

हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल. नोकरीत लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. अनेक माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे.  नवीन काम सुरू करू शकाल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही काळ अनुकूल दिसत आहे. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

धनु राशी:

तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मेहनतीचे फळ मिळेल. संपत्ती वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. रखडलेला पैसा परत मिळू शकतो. घर किंवा वाहन मिळू शकते. कमाई चांगली होईल. व्यवसायात लाभ होईल. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी