Saturn Gochar 2022 : शनि ग्रह २९ एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश करणार, ३ राशींना होणार फायदा

Shani Gochar 2022 After 30 Years Going To Enter In This Zodiac Destiny Of 3 Zodiac Signs Will More Shine : शनि ग्रह २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींना आर्थिक फायदा होणार आहे. 

Shani Gochar 2022 After 30 Years Going To Enter In This Zodiac Destiny Of 3 Zodiac Signs Will More Shine
Saturn Gochar 2022 : शनि ग्रह २९ एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश करणार, ३ राशींना होणार फायदा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Saturn Gochar 2022 : शनि ग्रह २९ एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश करणार, ३ राशींना होणार फायदा
  • शनि ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीच्या प्राणीमात्रांच्या आयुष्यावर परिणाम होतो
  • एका राशीत शनि ग्रहाचे वास्तव्य अडीच वर्ष

Shani Gochar 2022 After 30 Years Going To Enter In This Zodiac Destiny Of 3 Zodiac Signs Will More Shine : शनि ग्रह २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींना आर्थिक फायदा होणार आहे. 

शनि देवाला कलियुगाचा दंडाधिकारी असेही म्हणतात. हा दंडाधिकारी ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीच्या प्राणीमात्रांच्या आयुष्यावर परिणाम होतो, असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय सावकाश पुढे सरकणारा शनि ग्रह तब्बल तीस वर्षांनंतर २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. एका राशीत शनि ग्रहाचे वास्तव्य अडीच वर्ष असते. आता कुंभ राशीत प्रवेश करणारा शनि त्या राशीत अडीच वर्ष असेल. 

शनिला न्यायाधीश किंवा न्याय करणारा ग्रह असेही म्हणतात. आपल्या वाईट कृत्यांच्या शिक्षा शनि आपल्याला देतो. यामुळेच शनिच्या प्रवेशाचा परिणाम कुंभ राशीच्या प्राणीमात्रांवर दिसून येईल. तसेच शनिच्या कुंभ राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींच्या प्राणीमात्रांच्या रास आयुष्यात दिसून येतील. त्यांचा भाग्योदय होईल. या राशींच्या नागरिकांना आर्थिक लाभ होईल. 

  1. मेष : शनि ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश करताच मेष राशीच्या नागरिकांसाठी 'अच्छे दिन' सुरू होणार. शनि ग्रह अकराव्यात भावात गोचर करत आहे. मेष राशीच्या नागरिकांना शनि ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश करताच आर्थिक लाभ होण्यास सुरुवात होईल. मेष राशीच्या नागरिकांची रखडलेली आणि अडचणीत सापडलेली कामं पूर्ण होतील. अनेक विषयांत त्यांच्या हिताचे निर्णय होतील. धनलाभ होईल. नोकरीत बढतीचा तर व्यवसायात प्रगतीचा योग आहे. उत्पन्नात वाढ होईल. महत्त्वाचे करार करण्यासाठी उत्तम काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. नवी उत्तम संधी चालून येईल. प्रवास लाभदायी ठरेल. गुंतवणूक फलदायी ठरेल. तब्येतीत सुधारणा होईल.
  2. वृषभ : शनि दशम स्थानात गोचर करेल. यामुळे जे काम करत आहात त्यात प्रगतीचा योग आहे. नोकरीत बढतीचा, पगारवाढ होण्याचा योग आहे तर व्यवसायात नफा होण्याचा योग आहे. उत्पन्नात वाढ होईल. आपल्या हिताचे निर्णय होतील. धनलाभ होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. नवे काम तसेच महत्त्वाचे काम करण्यासाठी उत्तम काळ आहे. ज्येष्ठांचे आशीरर्वाद लाभतील. कामाच्या ठिकाणी अडचणी दूर होतील, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि शनि यांची मैत्री असल्यामुळे आपल्यासाठी उत्तम काळ सुरू होत आहे. नशिबाची साथ लाभणार आहे.
  3. धनु : शनि गोचर लाभदायी ठरेल. साडेसातीच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल. प्रगतीचा योग आहे. शनि तिसऱ्या भावातून अर्थात पराक्रम भावातून भ्रमण करेल. यामुळे अनेक धाडसी निर्णय घेऊन ते अंमलात आणणे आपल्याला शक्य होणार आहे. प्रतिष्ठा वाढेल. तब्येतीत सुधारणा होईल. धनलाभाचा योग आहे. लोखंड, तेल, दारू (मद्य किंवा अल्कोहोल) यापैकी एखाद्या क्षेत्रात नोकरी अथवा व्यवसाय करत असाल तर फायदा होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. भावाबहिणींची साथ लाभेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी