Saturn Gochar 2022 :  शनि देव ३० वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करणार, ३ राशींना होणार फायदा

Shani Gochar 2022 After 30 Years Going To Enter In This Zodiac Destiny Of 3 Zodiac Signs Will Shine : शनि ग्रह तब्बल तीस वर्षांनंतर २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींना आर्थिक फायदा होणार आहे. 

Shani Gochar 2022 After 30 Years Going To Enter In This Zodiac Destiny Of 3 Zodiac Signs Will Shine
Saturn Gochar 2022 :  शनि देव ३० वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करणार, ३ राशींना होणार फायदा 
थोडं पण कामाचं
  • Saturn Gochar 2022 :  शनि देव ३० वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करणार, ३ राशींना होणार फायदा
  • मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींना आर्थिक फायदा होणार
  • कुंभ राशीत प्रवेश करणारा शनि त्या राशीत अडीच वर्ष असेल

Shani Gochar 2022 After 30 Years Going To Enter In This Zodiac Destiny Of 3 Zodiac Signs Will Shine : शनि ग्रह तब्बल तीस वर्षांनंतर २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींना आर्थिक फायदा होणार आहे. 

शनि देवाला कलियुगाचा दंडाधिकारी असेही म्हणतात. हा दंडाधिकारी ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीच्या प्राणीमात्रांच्या आयुष्यावर परिणाम होतो, असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय सावकाश पुढे सरकणारा शनि ग्रह तब्बल तीस वर्षांनंतर २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. एका राशीत शनि ग्रहाचे वास्तव्य अडीच वर्ष असते. आता कुंभ राशीत प्रवेश करणारा शनि त्या राशीत अडीच वर्ष असेल. 

शनिला न्यायाधीश किंवा न्याय करणारा ग्रह असेही म्हणतात. आपल्या वाईट कृत्यांच्या शिक्षा शनि आपल्याला देतो. यामुळेच शनिच्या प्रवेशाचा परिणाम कुंभ राशीच्या प्राणीमात्रांवर दिसून येईल. तसेच शनिच्या कुंभ राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम मेष, वृषभ आणि धनु या तीन राशींच्या प्राणीमात्रांच्या आयुष्यात दिसून येतील. त्यांचा भाग्योदय होईल. या राशींच्या नागरिकांना आर्थिक लाभ होईल. 

  1. मेष रास - शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. याचा फायदा ज्यांची लग्न रास मेष आहे तसेच ज्यांची जन्म रास मेष आहे अशांना होणार आहे. या नागरिकांना आर्थिक लाभ होईल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्रश्न सुटतील. कोणाला उसने दिलेले पैसे परत मिळतील. आर्थिक मुद्यांवर अडलेली कामं पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. प्रवास फलदायी ठरतील. नव्या नोकरीची संधी मिळेल. गुंतवणूक लाभाची ठरेल. तब्येत सुधारेल.
  2. वृषभ रास - शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. याचा फायदा वृषभ राशीच्या नागरिकांना होईल. नोकरी, व्यवसायात प्रगतीचा योग आहे. आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. मान वाढेल. 
  3. धनु रास - शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. याचा फायदा धनु राशीच्या नागरिकांना होईल. प्रगतीचा आणि आर्थिक लाभाचा योग आहे. नेतृत्व करण्याची तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. ही संधी साधून आपण स्वतःचे स्थान आणखी बळकट करू शकाल. लोखंड, तेल, दारू या क्षेत्रांशी संबंधित व्यवसायात असलेल्यांची भरभराट होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. इतरांवर प्रभाव टाकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी